Malegaon Tender Scam : एमआयएम आमदाराचे टेंडरसंदर्भात ‘ते’ वाक्य अन्‌ विरोधकांसह मित्रपक्षही तुटून पडले

MIM MLA Controversial Statement : राष्ट्रवादीचे माजी आमदार असीफ शेख यांनी काही दिवसांपूर्वी मालेगाव महापालिकेत टेंडर घोटाळा झाल्याचा आरोप केला होता. पालिकेवर प्रशासक असल्याने शेख यांचा रोख पालकमंत्री दादा भुसे यांच्याकडे होता.
Asif Shaikh-MLA Mufti Ismail
Asif Shaikh-MLA Mufti Ismail Sarkarnama
Published on
Updated on

Malegaon News : अबोव्ह टेंडरची कामे चांगली होतात. तर, बिलो टेंडरची कामे निकृष्ट होतात, अशी जाहीर भूमिका एमआयएमचे आमदार मौलाना मुफ्ती इस्माइल यांनी घेत एकूणच टेंडर घोटाळ्यावर होत असलेल्या आरोपांवर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र, यामुळे आमदार मुफ्ती विरोधकांच्या रडारवर आले आहेत. (MIM MLA Mufti Ismail's controversial statement regarding tender)

राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) माजी आमदार असीफ शेख यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन मालेगाव महापालिकेत टेंडर घोटाळा झाल्याचा आरोप केला होता. महापालिकेवर सध्या प्रशासक असल्याने शेख यांचा रोख पालकमंत्री दादा भुसे यांच्याकडे होता. मात्र, शहरातील सलाम चाचा रस्त्याचे भूमिपूजन करताना आमदार मौलाना मुफ्ती यांनी अबोव्ह टेंडरची कामे उत्कृष्ट दर्जाची होतात. बिलोची कामे निकृष्ट दर्जाची असतात, अशी भूमिकाच जाहीर करून टाकली. (Malegaon Tender Scam )

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Asif Shaikh-MLA Mufti Ismail
Khed Politics : ठाकरे गटाने तेल ओतले; मोहितेंना डावलून चालणार नाही, खांडेभराडांचा पोखरकरांना टोला

आमदार मौलाना मुफ्ती यांच्या या भूमिकेला माजी नगरसेवक अस्लम अन्सारी यांनी जोरदार आक्षेप घेत त्यांच्यावर टीकेची झोड उठवली. मागील दहा वर्षांत विकास कामांचा क, ख, ग ही आला नाही. मुळात आमदारांना बिलो आणि अबोवचा अर्थच समजत नाही, अशी टीका अन्सारी यांनी केली.

औषधाच्या बाटलीवर छापील किंमत असताना मागणी केल्यास दुकानदार दहा टक्के सूट देतो. तशाच पद्धतीने टेंडरची कामेही होतात. निर्धारीत दरापेक्षा कमी दराने काम परवडल्यास ठेकेदार ते टेंडर भरतो, याचा अर्थ ते निकृष्टच होईल, असे नाही. अबोव टेंडरची कामे मंजूर करून आमदार जनतेच्या पैशांची लूट करीत असल्याची टीका अन्सारी यांनी केली.

Asif Shaikh-MLA Mufti Ismail
CM Eknath Shinde : मुख्यमंत्री शिंदे अन् गुंड निलेश घायवळच्या भेटीचा फोटो; राजकीय वर्तुळात खळबळ

दरम्यान, महापालिकेच्या भूयारी गटार योजनेची निविदा जादा दराने दिली होती. मात्र, माजी आमदार आसिफ शेख यांनी त्यास तीव्र विरोध केला होता. विरोधक उघडपणे पैशांची लूट करीत असताना आमदार मात्र मूग गिळून बसल्याची चर्चा मालेगावमध्ये सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिट्टी देऊन एमआयएममध्ये दाखल झालेल्या आमदार मुफ्ती सध्या विरोधकासह मित्रपक्षांकडून सातत्याने घेरले जात आहेत.

गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणरे समाजवादी पक्षाचे नेते मुश्तकीम डिग्निटी, शानेहिंद निहाल अहमद हे सुद्धा मुफ्ती यांच्यावर कठोर शब्दांत टीका करीत आहेत. माजी आमदार आसिफ शेख भ्रष्टाचाराच्या मुद्यासह विकासकामांना खिळ बसल्याचा आरोप करीत रान उठवत असताना आमदार मुफ्ती यांच्या नवीन विधानामुळे विरोधकांना आयते कोलित मिळाल्याची चर्चा मालेगावमध्ये होत आहे.

Edited By : Vijay Dudhale

Asif Shaikh-MLA Mufti Ismail
Lok Sabha Elections 2024 : राज्यात लोकसभा निवडणुकीचे वारे; राज ठाकरे कोणाला घाम फोडणार ?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com