Malegaon girl atrocities: बालिका अत्याचार प्रकरणात पोलिस अधिकाऱ्यांवर शिक्षणमंत्री दादा भुसे संतापले, केली ही मागणी!

Dada Bhuse & Rupali Chala kar brought the Malegaon police in cage of accused in girl child abuse case at Nashik-मालेगाव येथील बालिका अत्याचार प्रकरणी नागरिकांनी जिल्ह्याच्या विविध भागात काढला मोर्चा, महिलांचा संताप अनावर
Dada-Bhuse
Dada-BhuseSarkarnama
Published on
Updated on

Dada Bhuse News: डोंगराळे (मालेगाव) येथील चार वर्षीय बालिकेवर अत्याचार आणि हत्या प्रकरण घडले. त्याची पडसाद आता राज्यभर उमटू लागले आहेत. मालेगाव शहरात संतप्त नागरिकांनी महिलांनी मोर्चा काढून आक्रोश व्यक्त केला.

डोंगराळे येथे चार वर्षे बालकेवर अत्याचार करून खून करण्यात आला. त्यामुळे संतापाची लाट उसळली आहे. राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष रूपाली चाकणकर, भाजपच्या आमदार चित्रा वाघ आदींनी या कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले. विविध सामाजिक संघटनांनी त्यावर संताप व्यक्त केला आहे.

गेले चार दिवस या प्रश्नावर मालेगाव परिसरात तणावाचे वातावरण आहे. दुकाने, बाजार समिती आणि विविध संस्था बंद ठेवून नागरिकांनी निषेध व्यक्त केला आहे. या प्रश्नावर आता राज्यभर प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.

Dada-Bhuse
Eknath Khadse : सुनबाईसाठीच खडसेंची निवडणुकीतून माघार, एकनाथ शिंदेंचे दोन्ही आमदार तुटून पडले..

संतप्त नागरिकांनी शुक्रवारी या प्रश्नावर मोर्चा काढला. आरोपीला न्यायालयाच्या आवारात ताब्यात द्यावे अशी मागणी करण्यात आली. यावेळी महिलांचा संताप अनावर झाल्याने त्यांनी न्यायालयाचे दार तोडून प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांची परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी धावपळ उडाली.

Dada-Bhuse
Kumbh Mela politics: कुंभमेळ्यासाठी प्रशासनाची वृक्षतोड, उद्धव ठाकरेंच्या नेत्याने सुचवला सुवर्ण मध्य!

यावेळी शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी मोर्चाला संबोधित केले. यावेळी मालेगावचे माजी आमदार आसिफ शेख यांसह विविध पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते. या प्रकरणात आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.

आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले. चार दिवसांची पोलीस कोठडी संपली होती. तेव्हा त्याला न्यायालयीन कोठडी मिळावी अशी मागणी तपासाधिकारी यशवंत बाविस्कर यांनी केली. त्यावर नागरिकांनी संताप व्यक्त केला.

मंत्री भुसे यांनी तपास अधिकाऱ्याला थेट आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. पोलिसांच्या तपासावर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पोलीस कोठडी आवश्यक असताना न्यायालयीन कोठडी मागितल्याने संताप व्यक्त केला. या संदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करणार असल्याचे मंत्री भुसे म्हणाले.

या प्रकरणाने आता गंभीर वळण घेतले आहे. पोलीस अधीक्षक ते तेगबीरसिंग संधू यांनी या प्रकरणात लक्ष घातले आहे. मालेगाव न्यायालयातील वकिलांनी बाली केल्या न्याय मिळावा म्हणून एकत्रित वकीलपत्र दाखल केले आहे. त्यांच्या हस्तक्षेपानंतर आरोपीला न्यायालयाने सात दिवसांची कोठडी सुनावली.

या प्रश्नावर जनतेच्या भावना तीव्र आहेत. त्याची दखल राजकीय नेते आणि मंत्र्यांनीही घेतली आहे. हे प्रकरण आता गंभीर वळणावर पोहोचल्याने पोलीस यंत्रणाही सजग झाली आहे.

-------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com