Eknath Khadse : सुनबाईसाठीच खडसेंची निवडणुकीतून माघार, एकनाथ शिंदेंचे दोन्ही आमदार तुटून पडले..

Eknath Khadse’s withdrawal for Raksha Khadse : मुक्ताईनगरमध्ये नंगरपंचायतीच्या निवडणुकीत भाजप व शिवसेनेची युती फिस्कटली आहे. त्यामुळे भाजप व शिवसेना आमनेसामने येणार आहेत. शिवसेना भाजपत सरळ सामना रंगणार आहे.
Eknath Khadse
Eknath Khadse
Published on
Updated on

Jalgaon Politics : जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगरात नगरपंचायत निवडणुकीमुळे राजकारण चांगलंच तापलं आहे. भाजप आणि शिवसेना (शिंदे गटात) आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील व गुलाबराव पाटील यांनी खडसे कुटुंबावर घराणेशाहीचा आरोप केला आहे. सुनबाईसाठीच खडसेंनी नगरपालिका निवडणुकीतून माघार घेतल्याचा आरोप दोन्ही आमदारांनी केला आहे.

मुक्ताईनगर तालुका हा एकनाथ खडसे यांचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र खडसेंनी मुक्ताईनगर नगरपंचायत निवडणुकीतून माघार घेतली आहे. एकनाथ खडसे यांनी 'आमच्याकडे उमेदवार नाहीत' आणि 'निवडणूक लढवण्यासाठी लागणारा पैसा उपलब्ध नाही,' आमची ताकद कमी आहे असे सांगून अचानक निवडणुकीतून माघार घेतली. त्यांनी एकही उमेदवार दिला नाही.

परंतु खडसेंनी आपल्या सुनबाई रक्षा खडसे यांच्यासाठी निवडणुकीत माघार घेतल्याचा आरोप आमदार गुलाबराव पाटील व चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्यावर केला आहे. घरातलं नातं असल्यामुळे खडसेंनी माघार घेतली. सुनबाई केंद्रात मंत्री आहे, त्यांचा पॅनल निवडून आणण्यासाठी मदत करणं हे स्वाभाविक आहे. खडसेंनी सुनबाईला मदत करण्यासाठीच माघार घेतली आहे. खडसेंची राजकारण सोयीचं आहे. एकीकडे भुसावळ मध्ये भाजप व शिवसेनेच्या विरोधात लढताय आणि मुक्ताईनगरातून लढायला काय अडचण आहे असा सवाल गुलाबरावांनी उपस्थित केला आहे.

Eknath Khadse
BJP Strategy : नाशिकमध्ये महाविकास आघाडीच्या अर्ध्या उमेदवारांच्या हातात कमळ, भाजपची खेळी ठाकरे व पवारांनाही उमगली नाही

राष्ट्रवादीला मी उत्तर महाराष्ट्रात वाढवेल असं शरद पवारांना सांगून खडसेंनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. पण आता मुक्ताईनगरमध्येच राष्ट्रवादी राहीली नाही. तेव्हा उत्तर महाराष्ट्रात कुठे राहणार. असा टोला त्यांनी खडसेंना लगावला.

आपल्या कुटुंबात दोन्ही पक्ष ठेवायचे व दोन्ही पक्षांचा उपयोग करुन घ्यायचा. आपल्या कुटुंबातील लोकांना कशी मदत होईल हे पाहायचं. त्यासाठी पक्षाला वेठीस धरायचे ही खडसेंची रणनिती आहे. विशेष म्हणजे डसेंच्या निर्णयावर राष्ट्रवादीचा शरद पवार साहेबांच्या गटाचा एकही निष्ठावंत पदाधिकारी किंवा नेता चकार शब्द सूद्दा बोलला नाही याचे नवल वाटते असे आमदार चंद्रकांत पाटील म्हणाले. घराणेशाही कशाला म्हणतात तर जिल्हा बॅंकेत मुलगी, दुध संघात बायको, सुनबाई खासदार, स्वत:आमदार याला घराणेशाही म्हणतात. कुटुंबाशिवाय खडसेंना काही दिसत नाही. असा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

दरम्यान यावर मंत्री रक्षा खडसेंनी आमदार चंद्रकांत पाटील यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं आहे. रक्षा खडसे म्हणाले, आमदार साहेबांना नेहमीच आमच्या परिवाराशी प्रॉब्लेम राहिला आहे. मी कधी त्यांच्या वादात पडली नाही. मी इतकच सांगेल की, असं काही नाही. एकनाथ खडसेंचा निर्णय व्यक्तिगत आहे. त्यांना उमेदवार मिळाले नाहीत किंवा काहीही कारण असो ते त्यांचे त्यांना माहित.

Eknath Khadse
Nashik Municipal Election : जागा वाटपावरून तणाव : भाजपकडून फारच कमी जागांची ऑफर, नाराज शिवसेनेचा पुढचा निर्णय कोणता?

घराणेशाहीचे आरोप आमच्यावर लावले जाताय. मग, शिवसेनेकडून पण काय होतंय. शिवसेनेच्या लोकांनी निवडणून आणण्यासाठी भाजपच्या लोकांनी सपोर्ट केला. युतीसाठी आम्ही पण तयार होतो, पण जेव्हा आम्ही जास्त जागा मागितल्या तेव्हा आम्हाला नकार देण्यात आला. भारतीय जनता पार्टीचं इथं काहीच नाही असं सांगण्यात आलं. पण असं नाही. भारतीय जनता पार्टीची ताकद इथे पूर्वीपासून आहे असं रक्षा खडसेंनी सुनावलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com