Sanjay Raut : "फेकूचंद मुख्यमंत्र्यांवर कोण विश्वास ठेवणार, ते...", राऊतांचं शिंदेंना प्रत्युत्तर

Sanjay Raut On Eknath Shinde : "महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावून विधानसभा बरखास्त करावी", अशी मागणी राऊतांनी केली आहे.
Sanjay Raut, Eknath Shinde
Sanjay Raut, Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येमागे तिसऱ्या व्यक्तीचा हात नाही ना? अशी शंका शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांनी व्यक्त केली होती. या विधानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांनी भाष्य केलं होतं. "सीआयडी, क्राईम पेट्रोल पाहून उद्धव ठाकरे यांच्यात करमचंद जासूस अवरतरला आहे," अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली होती. आता शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना 'फेकूचंद' म्हणत प्रत्युत्तर दिलं आहे.

Sanjay Raut, Eknath Shinde
Ahmednagar News : "तुम्ही ओरबाडून सत्ता मिळवली, पण आता...", भाजप आमदाराची थोरातांवर टीका

"मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंना करमचंद जासूस म्हटलं. पण, या फेकूचंद मुख्यमंत्र्यांवर कोण विश्वास ठेवणार. ते गुंडांचे सरदार आहेत. तसेच, चोरांची टोळी ते चालवतात. त्यांचं चोरमंडळ असून त्याचे सरदार फेकूचंद आहेत. करमचंद जासूसनं देशात चांगलं काम केलं आहे," असा हल्लाबोल संजय राऊतांनी मुख्यमंत्र्यांवर ( Sanjay Raut ) केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

"मुख्यमंत्र्यांबरोबर खंडणीखोर, चोर, बलात्कारी, खुनी असतात"

"रोज चार गुडांबरोबर बैठका घेऊन बुद्धीचे दरवाजे उघडत नाहीत. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांबरोबर लेखक, साहित्यिक, कवी आम्ही पाहिले आहेत. पण, आताच्या मुख्यमंत्र्यांबरोबर खंडणीखोर, चोर, बलात्कारी, अपहरकर्ते, खुनी असल्यामुळे त्यांना आसपास सगळेच करमचंद दिसत आहेत. तुरूंगात असायला पाहिजे असणारे लोक मुख्यमंत्र्यांबरोबर दिसत आहेत. उद्धव ठाकरेंचं छायाचित्र कलेत जागतिक नाव आहे. मुख्यमंत्र्यांचं कशात नाव आहे?" असा खोचक सवालही राऊतांनी उपस्थित केला.

Sanjay Raut, Eknath Shinde
Santosh Bangar Controversial : आधी मिशी, फाशी अन् आता उपाशी; आमदार बांगरांची गाडी थांबेचना!

"...अन्यथा गुंड महाराष्ट्रात हौदोस घालतील"

"महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्थेवर लक्ष द्यायला हवं. मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना राज्य सांभाळणं कठीण झालं आहे. कारण, राज्याचा गुंडांनी ताबा घेतला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावून विधानसभा बरखास्त करावी. अन्यथा गुंड महाराष्ट्रात हौदोस घालतील. महाराष्ट्रातील सरकारच्या गुंडगिरीविरोधात कोणतं आंदोलन करावं, काय पाऊलं उचलावीत, याबद्दल महाविकास आघाडीत चर्चा सुरू आहे," असं संजय राऊतांनी सांगितलं.

Sanjay Raut, Eknath Shinde
Sanjay Kute: महिला सरपंचांचा अवमान करणं भाजप आमदाराच्या अंगलट; सामाजिक संघटना एकवटल्या...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com