Devendra fadnavis Politics: नाशिकचे पालकमंत्री कोण?, मुख्यमंत्री म्हणाले, ‘मै हु ना’

Devendra fadnavis; Nashik's Guardian Minister Issue remains undecided In Chief Minister's Nashik visit -नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याच्या आढावा बैठकीत देखील पालकमंत्री पदाचा प्रश्न अनिर्णित
Devendra-Fadanvis-Girish-Mahajan.jpg
Devendra-Fadanvis-Girish-Mahajan.jpgSarkarnama
Published on
Updated on

Devendra fadnavis News: सिंहस्थ कुंभमेळा राज्यासाठी मोठा प्रकल्प आहे. त्याची तयारी लवकर सुरू व्हावी यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकचा दौरा केला. या दौऱ्यात पालकमंत्री पदाचा विषय चर्चेत होता.

राज्यातील नाशिक आणि रायगड या दोन जिल्ह्यांचे पालकमंत्री नियुक्त झाले. मात्र त्याला लगेचच स्थगिती मिळाली. गेले अडीच महिने या जिल्ह्यात येथे पालकमंत्री नाहीत. त्यामुळे नाशिकचे पालकमंत्री कोण? हा सगळ्यांसाठी गंभीर विषय आहे. या संदर्भात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे नाव आघाडीवर आहे.

Devendra-Fadanvis-Girish-Mahajan.jpg
Farmers Politics: कांदा उत्पादकांना दिलासा, मुख्यमंत्री म्हणतात, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार!

आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिंहस्थ कुंभमेळ्याचा आढावा घेतला. त्यासाठी विविध शासकीय विभागांच्या नियोजनाचे सादरीकरण करण्यात आले. यातील काही कामांना मुख्यमंत्र्यांनी तातडीने सुरू करण्यासाठी सूचनाही दिल्या. गोदावरी स्वच्छता हा त्यात प्राधान्याचा विषय होता.

Devendra-Fadanvis-Girish-Mahajan.jpg
Manikrao Kokate Politics: कृषीमंत्री माणिकराव कोकाटे, २५ संचालकांना १८२ कोटींची नोटीस, हाती काय लागणार?

यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांना नाशिकच्या पालकमंत्री पदाच्या नियुक्तीला होणारा विलंब लक्षात आणून देण्यात आला. याबाबत पत्रकारांनी देखील मुख्यमंत्र्यांना पालकमंत्र्यांची घोषणा केव्हा होणार? याची विचारणा केली. त्यामुळे आजच्या मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात पालकमंत्री कोण? याचीच अधिक चर्चा झाली.

यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही तेवढ्याच तीव्रतेने त्याचे उत्तर दिले. ते म्हणाले, पालकमंत्री लवकरच नियुक्त होतील. त्याबाबत थोडासा उशीर जरूर झाला आहे. मात्र पालकमंत्री नसले तरी मुख्यमंत्री सर्व विषय हाताळतात. त्यामुळे मी आहे ना, काळजी करू नका.

नाशिकचे पालकमंत्री म्हणून भाजपचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची घोषणा झाली होती. मात्र त्याला स्थगिती देण्यात आली. नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आग्रही आहेत. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांचे नावही पालकमंत्री पदासाठी स्पर्धेत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचे देखील पालकमंत्री म्हणून नाव घेतले जात आहे.

या स्थितीत नाशिकच्या पालकमंत्री पदाबाबतची घोषणा लवकरच होईल, असे वारंवार सांगण्यात आले आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या दौऱ्यातही लवकरच घोषणा होईल, हे पुन्हा एकदा स्पष्ट करण्यात आले. ‘लवकर’ या शब्दाची महायुती सरकारची व्याख्या काय? याची चर्चा या निमित्ताने होऊ लागली आहे.

-----

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता कॉमस्कोअरमध्ये Number One डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातील नवी झेप

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com