

Dhule Ration grain scam: रेशन दुकानावरून होणारा धान्याचा पुरवठा नेहमीच वादाचा विषय ठरला आहे. आता धुळे येथे कोट्यावधी रुपयांच्या धान्याचा घोटाळा उघड झाला आहे. यासंदर्भात पुरवठा अधिकारीच जाळ्यात अडकला. धुळे एमआयडीसी विभागातील अवधान येथील शासकीय पुरवठा विभागाच्या धान्य गोदामात हा घोटाळा घडला. पुरवठा अधिकाऱ्याने रेशन दुकानदारांच्या मदतीने कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार केला. यामध्ये रेशन दुकानदार आणि वाहतूक कंत्राटदार अडकण्याची चिन्हे आहेत.
धुळे जिल्ह्यातील अवधान येथील शासकीय धान्य गोदामात गहू आणि तांदळाच्या साठ्यात तफावत आढळली असून, तब्बल १.१४ कोटी रुपयांचे धान्य प्रत्यक्ष वितरित न करता कागदोपत्री वितरण दाखविल्याचा आरोप आहे. या प्रकरणी भांडार अधीक्षक नीरज अशोक पाटील यांच्याविरोधात मोहाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मनमाड येथील अन्न महामंडळाच्या गोदामातून पुरवठा विभागाच्या वितरणासाठी या गोदामाला धान्य पुरवठा होतो. मनमाडच्या वखार महामंडळातून १९६६ क्विंटल गहू (६१.८५ लाख) आणि १२०८ क्विंटल तांदूळ (५३.०७ लाख) रेशन दुकानामार्फत गरिबांना वितरणासाठी पुरवठा झाला होता. वखर महामंडळाचे अधिकारी गुलाबचंद आनंदराम देवांगन हे अवधान येथील अन्न महामंडळाच्या गोदामत तपासणीसाठी गेले होते. त्यांनी तपासणी केली असता गहू आणि तांदूळ कागदावरच वितरित झाल्याचे आढळले. गोदामात संबंधित धान्याच्या साठ्यात तफावत आढळली.
भंडाराधिक्षक नीरज पाटील हा पुरवठा विभागाचा वरिष्ठ अधिकारी आहे. गरिबांना सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत होणाऱ्या पुरवठा धान्यात अपहार केल्याचे आढळून आले. धान्याचा पुरवठा प्रत्यक्षात न करता कागदावरच करून आर्थिक गैरव्यवहार केला. हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यावर धान्य पुरवठ्याची चौकशी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
सार्वजनिक वितरण विभागाचे रेशन दुकानदार बहुतांशी राजकीय पक्ष आणि नेत्यांची संबंधित असतात. अनेक पुरवठादार हे थेट राजकीय पक्षांत कार्यरत असतात. या विभागात मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाले आहेत. त्यात एका नव्या घोटाळ्याची भर पडली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.