NCP Nashik News : तरुणाईचे प्रश्न सोडवायला अजित पवार आहेत ना!

Ajit Pawar News : संग्राम कोते- पाटील यांनी नाशिक येथील महाविद्यालयीन तरुणांशी संवाद साधला
Dy. CM Ajit Pawar & Sangram Kote-Patil
Dy. CM Ajit Pawar & Sangram Kote-PatilSarkarnama
Published on
Updated on

Nashik Latest News : रोजगारापासून शिक्षणाच्या विविध समस्यांपर्यंत युवकांना प्रश्नांना सामोरे जावे लागते. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) संग्राम कोते पाटील यांनी नाशिकच्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. (Sangram kote Patil made dialogue with Collage students in Nashik)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) (अजित पवार गट) (Ajit Pawar) पुढील वाटचालीत सरकारच्या (Maharasjhtra) माध्यमातून युवकांच्या प्रश्नांना सर्वाधिक प्राधान्य दिले जाणार असल्याचे संग्राम कोते पाटील म्हणाले.

Dy. CM Ajit Pawar & Sangram Kote-Patil
Chhagan Bhujbal: कंत्राटी नोकरभरतीच्या प्रश्नावर भुजबळांनी गप्प राहणेच पसंत केले!

शैक्षणिक प्रश्नांसह विविध प्रश्नांना युवकांना सामोरे जावे लागत आहेत. त्यांचे अनेक प्रश्न आहेत. विशेषतः सरकारच्या धोरणांबाबत त्यांना काही समस्या जाणवतात. याबाबतचा आढावा घेण्यासाठी आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आपल्या संघटनात्मक तसेच विस्तार कार्यक्रमात प्राधान्य देऊन युवकांना सामावून घेणार आहे. त्यासाठी राज्याच्या विविध भागातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला जाणार आहे.

याबाबत संग्राम कोते-पाटील यांच्या उपस्थितीत नाशिकला कार्यक्रम झाला. महाराष्ट्रातील विद्यार्थी आणि युवकांच्या प्रश्नांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांना जाण आहे. आगामी काळात उपमुख्यमंत्री पवार हे राज्यातील तरुणांचे प्रश्न सोडवतील, असा विश्वास कोते पाटील यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेस आगामी काळात युवकांवर फोकस करून काम करणार, याचे संकेत आहेत.

संग्राम कोते- पाटील यांनी विद्यार्थ्यांसमवेत सव्वा तास चर्चा केली. यावेळी विद्यार्थ्यांनी पात्रता शुल्क परीक्षा शुल्क जात पडताळणीच्या वेळी येणाऱ्या विविध अडचणी संदर्भात मागण्या मांडल्या तसेच महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या संदर्भातील काही प्रश्न विद्यार्थ्यांनी यावेळी मांडले.

Dy. CM Ajit Pawar & Sangram Kote-Patil
Shivsena Nashik News : ‘ड्रग्ज’मुळे शिवसेनेला मिळाली नवी ताकद!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com