Eknath Khadse : खडसेंच्या फार्महाऊसवर ड्रोनद्वारे रेकी; गिरीश महाजनांच्या ‘दाऊद’ उल्लेखाने जुनं प्रकरण चर्चेत

Girish Mahajan On Eknath Khadse Farmhouse Drone Recce : एकनाथ खडसे यांच्या मुक्ताईनगर येथील ‘खडसे फार्म’वर ड्रोनद्वारे रेकी करण्यात आल्याचा दावा खडसेंनी केला आहे. त्यावर मंत्री गिरीश महाजन यांनी भाष्य केलं आहे.
Eknath Khadse & Girish Mahajan
Eknath Khadse & Girish MahajanSarkarnama
Published on: 
Updated on: 

Eknath Khadse Farmhouse Drone Recce : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार एकनाथ खडसे यांच्या मुक्ताईनगर येथील ‘खडसे फार्म’वर अज्ञात व्यक्तीकडून रात्रीच्या वेळी ड्रोनद्वारे संशयास्पद रेकी करण्यात आल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.

आपल्याविरोधात मोठे षडयंत्र रचले जात असल्याची शंका व्यक्त करीत आमदार खडसे यांनी जळगावचे पोलिस उपअधीक्षकांकडे पत्राद्वारे तक्रार दाखल केली आहे. याशिवाय उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी खडसेंनी केली असताना, आता याप्रकरणावर भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी देखील भाष्य केलं आहे.

या प्रकरणावर बोलताना गिरीश महाजन यांनी खडसे यांच्याशी संबंधित यापूर्वीच्या काही घटनांचा उल्लेख केला आहे. एकनाथ खडसे यांच्या घराची रेकी हा गंभीर विषय असल्याचा उपरोधिक टोला गिरीश महाजन यांनी लगावला.

महाजन म्हणाले, मागेही ते (खडसे) काहीतरी दाऊद वैगेरे असे काही तरी म्हणत होते. हा गंभीर विषय असल्याचं महाजनांनी म्हटलं आहे. खडसे यांच्याबाबत दाऊद इब्राहिम आणि छोटा शकील यांच्या नावाने देण्यात आलेल्या धमकीच्या प्रकरणाचा अप्रत्यक्ष संदर्भ महाजन यांनी दिल्याने त्यांच्या वक्तव्याची चर्चा सुरू झाली आहे.

महाजन म्हणाले, त्यांच्या घराची रेकी झाली असेल तर त्याची चौकशी झाली पाहिजे. मागेही त्यांच्या बंगल्यात चोरी झाली होती. त्यामुळे ड्रोनद्वारे नेमकी कोणत्या उद्देशाने रेकी करण्यात आली. त्यामागे कोण होते आणि या घटनेचा उद्देश काय होता याचा तपास यंत्रणांनी करणे गरजेचे असल्याचे महाजन यांनी स्पष्ट केले.

Eknath Khadse & Girish Mahajan
Ganesh Gite : सलग तीन वेळा धक्के खाल्ले, अखेर गणेश गितेंचं राजकीय पुनर्वसन झालं, कुणाची कृपा?

एकनाथ खडसे यांना एप्रिल २०२४ मध्ये अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि त्याचा हस्तक छोटा शकील यांच्या नावाने जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचे प्रकरण समोर आले होते. या प्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती, तसेच गुन्हाही नोंदवण्यात आला होता. त्यावेळी धमकीच्या प्रकरणामुळे खडसे यांच्या सुरक्षेचा मुद्दा चर्चेत आला होता. आता फार्म हाऊसवर ड्रोनद्वारे रेकी झाल्याचा आरोप खडसेंनी केल्यानंतर महाजन यांनी त्या जुन्या धमकी प्रकरणाचा पुन्हा उल्लेख केला.

Eknath Khadse & Girish Mahajan
Nida Khan : धर्मांतर प्रकरणात अडकलेल्या निदा खानच्या खाजगी आयुष्यात वादळ : जामीन मिळाला, पण पतीकडून घटस्फोटासाठी कोर्टात अर्ज

महाजनांनी अशाप्रकारे जुन्या घटनांचा दाखला दिल्याने केवळ ड्रोन प्रकरणापुरता मर्यादित असलेला मुद्दा पुन्हा राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या केंद्रस्थानी आला आहे. एकीकडे ड्रोन प्रकरणाची चौकशी आवश्यक असल्याचे सांगत आपणही पोलिसांना पत्र देऊ असं महाजनांनी म्हटलं तर त्याचवेळी दुसरीकडे महाजनांनी खडसे यांच्याशी संबंधित जुन्या घटनांचा संदर्भ दिल्याने दोघांमध्ये पुन्हा वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com