Ganesh Gite : सलग तीन वेळा धक्के खाल्ले, अखेर गणेश गितेंचं राजकीय पुनर्वसन झालं, कुणाची कृपा?

Ganesh Gite Appointed Nashik APMC Chairman : सलग तीन वेळा राजकीय धक्के खाल्लेल्या भाजप नेते गणेश गिते यांचे अखेर राजकारणात पुनर्वसन झालं आहे. नाशिक बाजार समितीच्या अध्यक्षपदी त्यांची वर्णी लागली.
Ganesh Gite bjp
Ganesh Gite BJPSarkarnama
Published on: 
Updated on: 

Nashik Politics : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीवर शासनाकडून अशासकीय प्रशासक मंडळ नियुक्त करण्यात आलं असून भाजप नेते गणेश गिते यांची अध्यक्षपदावर वर्णी लागली आहे. यानिमित्ताने राजकारणात काहीसे साइड ट्रॅक झालेल्या गणेश गिते यांचे अखेर राजकीय पुनर्वसन झाले आहे.

गणेश गिते हे गेल्या विधानसभा निवडणुकीत आमदार होण्याच्या इराद्याने आखाड्यात उतरले. नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात भाजपकडून राहुल ढिकले यांना उमेदवारी मिळाल्याने गिते यांनी भाजपला रामराम ठोकत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करुन ढिकले यांच्याविरोधात शड्डू ठोकला. मात्र या लढाईत ढिकले यांच्यापुढे गिते यांचा टिकाव लागला नाही. गिते पराभूत झाले. हा गिते यांच्यासाठी पहिला धक्का होता. त्यानंतर पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या सोबतच्या जवळकीने त्यांनी पुन्हा भाजपत प्रवेश केला. यादरम्यान गिते यांनी अजूनही आमदारकीची आशा सोडलेली नव्हती.

त्यानंतर झालेल्या महापालिका निवडणुकीत गणेश गिते यांच्या पत्नी दीपाली गिते भाजपकडून नगरसेवक म्हणून निवडून आल्या. महापालिकेत भाजपची सत्ता आल्याने गितेंनी पुन्हा एकदा पत्नीच्या रुपाने महापौरपद घरात आणण्यासाठी फील्डिंग लावली. मात्र, तिथेही त्यांचा प्रयत्न अंतर्गत विरोधकांनी हाणून पाडला. हा गिते यांच्यासाठी दुसरा धक्का होता, ज्यात त्यांना प्रयत्न करुनही यश आलं नाही. मात्र, यावेळी त्यांनी विधानपरिषदेसाठी शब्द सोडवून घेतला होता.

Ganesh Gite bjp
Nida Khan : धर्मांतर प्रकरणात अडकलेल्या निदा खानच्या खाजगी आयुष्यात वादळ : जामीन मिळाला, पण पतीकडून घटस्फोटासाठी कोर्टात अर्ज

परंतु, प्रत्यक्षात विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून पक्षाच्या दबावामुळे गणेश गिते यांना माघार घ्यावी लागली. कारण महायुतीत ही जागा शिंदेसेनेच्या वाट्याला गेली होती. पक्षाचा आदेश आला अन् गणेश गितेंना अर्ज माघारी घ्यावा लागला हा त्यांच्यासाठी तिसरा मोठा धक्का होता. अर्थात त्यांचे बंधू गोकुळ गिते यांच्यापुढे पक्षीय बंधन नसल्याने ते निवडणुकीच्या रिंगणात उतरले आणि निवडूनही आले. यानिमित्ताने गितेंच्या घरात आमदारकी आली.

Ganesh Gite bjp
Nashik APMC : नाशिक बाजार समितीच्या विभाजनानंतर नवी खेळी; अध्यक्षपदी भाजपचे गणेश गिते यांची नियुक्ती

त्यानंतर त्याच आमदार गोकुळ गिते यांनी अखेरीस आपले बंधू गणेश गिते यांचे बाजार समितीच्या माध्यमातून राजकीय पुनवर्सन केलं. त्यासाठी अर्थात त्यांना पुन्हा एकदा मंत्री गिरीश महाजन यांच्यासह पणनमंत्री जयकुमार रावल यांचाही आशीर्वाद लाभल्याचे बोलले जात आहे.

बाजार समितीच्या प्रशासकीय मंडळात गणेश गिते यांची अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. माजी आमदार बाळासाहेब सानप, बापू पिंगळे, सचिन ढिकले यांची सदस्यपदी नियुक्ती झाली आहे. आमदार गोकुळ गिते यांनी या नावांची शिफारस केल्याचे पत्र व्हायरल झाले होते. त्यांचीच नियुक्ती झाली आहे. यातून गोकुळ गिते यांनी आपले राजकीय वर्चस्व सिद्द केलं आहे. आमदार राहुल ढिकले यांच्या विरोधकांना प्रशासक मंडळात आणून एकप्रकारे त्यांनाही शह देण्याचा प्रयत्न या निमित्ताने केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com