Eknath Shinde politics: नाशिकमध्ये काँग्रेसला धक्का, `हे` नगरसेवक शिंदे गटात दाखल!

Eknath Shinde: Congress ex corporator Joy Kamble joints Shivsena Shinde Group-आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाकडून शहरात तोडफोडीला सुरुवात
Eknath shinde With Congress Ex Corporator Joy Kamble
Eknath shinde With Congress Ex Corporator Joy KambleSarkarnama
Published on
Updated on

Congress News: विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे बहुमत मिळाले. मात्र महापालिकेत काय होते, या भितीने काँग्रेस आणि अन्य पक्षाच्या अनेक नगरसेवकांना मधाचे बोट लावण्याचे काम सुरू झाले आहे. यातूनच दोन नगरसेवकांचे आज पक्षांतर झाले.

नाशिक शहर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला आज मोठा धक्का बसला. काँग्रेसचे माजी नगरसेवक जॉय कांबळे यांनी आज मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थिती शिवसेना शिंदे पक्षात प्रवेश केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेविका सुषमा पगारे यांचाही प्रवेश झाला.

Eknath shinde With Congress Ex Corporator Joy Kamble
Sharad Pawar NCP : पदाधिकारी बदला, भाकरी फिरवा अन् तरुणांना द्या संधी!

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेसच्या अनेक नगरसेवकांमध्ये अस्वस्थता होती. वरिष्ठ नेत्यांचा दुरावा आणि आगामी निवडणुकीत विसंवाद लक्षात घेता राजकीय अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाल्याची भावना त्यांच्यात होती. त्याचा परिणाम आज दिसून आला.

Eknath shinde With Congress Ex Corporator Joy Kamble
Sharad Pawar : शरद पवारांच्या समोरच मोठी मागणी, पक्षातील दलालांची चौकशी करा!

मुंबईत आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या या प्रवेश प्रसंगी खासदार श्रीकांत शिंदे, भाऊसाहेब चौधरी, पक्षाचे सचिव विजय करंजकर, उपनेते राजू अण्णा लवटे, महानगरप्रमुख प्रवीण तिने आदी उपस्थित होते.

राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी शहरात दोन गदिवसांपूर्वी मेळावा घेताल होता. त्यात त्यांनी अन्य पक्षाच्या नगरसेवक व नेत्यांचे स्वागत केले जाईल. या प्रवेशांमुळे पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी अस्वस्थ होऊ नये, असे आवाहन केले होते.

या प्रवेशाबाबत काँग्रेसचे शहराध्यक्ष आकाश छाजेड यांनी खेद व्यक्त केला. अमिषा पोटी हे सर्व प्रकार घडत आहेत. महायुतीला विधानसभेत बहुमत मिळाले. मात्र त्यांच्यात अद्यापही आत्मविश्वासाचा अभाव आहे. त्यामुळेच ते विरोधी पक्षाच्या नेत्यांना विविध प्रयोग करून सामील करून घेत आहेत. तोडफोडीचे राजकारण महाराष्ट्रात अद्यापही सुरूच आहे. महाराष्ट्रातील जनता याला उत्तर देईल, असे त्यांनी सांगितले.

माजी नगरसेवक जॉय कांबळे हे काँग्रेसचे निष्ठावंत नेते (कै) उत्तमराव एलिया कांबळे यांच्या चिरंजीव आहेत. (कै) उत्तमराव कांबळे १९६७ पासून नगरसेवक होते. त्यांनी महापालिका स्थायी समितीचे सभापती म्हणून देखील काम पाहिले होते. पक्षाचे एक निष्ठावंत पदाधिकारी म्हणून त्यांच्याकडे पाहिले जायचे. आज (कै)उत्तमराव कांबळे असते तर असा प्रवेश होऊ शकला नसता अशी प्रतिक्रिया शहराध्यक्ष छाजेड यांनी व्यक्त केले.

दरम्यान आज मुंबईत शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाची बैठक झाली. शहरातील पदाधिकारी आणि माजी नगरसेवकांना या बैठकीसाठी निमंत्रित करण्यात आले होते. या बैठकीला शिवसेना ठाकरे पक्षाचे सिडको आणि सातपूर येथील प्रत्येकी एक नगरसेवक अनुपस्थित होता. हे नगरसेवक देखील निधीच्या अपेक्षेने शिवसेना शिंदे पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे. येथे एक-दोन दिवसात हे प्रवेश होतील असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com