NCP News : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची आढावा बैठक काल मुंबईत झाली. यावेळी विधानसभा निवडणुकीतील पराभवाचा आढावा घेण्यात आला. यावेळी नाशिकच्या पदाधिकाऱ्यांनी अंतर्गत बंडाळीच्या तक्रारी केल्या.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने नाशिक जिल्ह्यात पाच मतदारसंघात उमेदवार दिले होते. ही उमेदवारी देताना स्थानिक युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी इच्छुक उमेदवारांना छळले. त्यांच्याकडून पैशांची मागणी केली. अक्षरशः बाहेरून आलेल्या काही उमेदवारांसाठी दलाली केली, अशी चर्चा होती.
या सर्व प्रकारांमुळे पक्षाचे पदाधिकारी आणि उमेदवार त्रस्त झाले होते. त्याचा स्फोट काल मुंबईत झालेल्या बैठकीत झाला. यावेळी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीतच काही इच्छुक उमेदवारांच्या संतापाचा उद्रेक झाल्याने तो चर्चेचा विषय ठरला.
यावेळी एका पदाधिकाऱ्याने नाशिक शहरात महानगरपालिका निवडणुकीचा पक्षाने अजिबात विचार केला नाही,असे सांगितले. ते म्हणाले, शहरातील तीनही जागा शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला देण्यात आल्या. देवळाली ही हक्काची आणि विद्यमान आमदार असलेला मतदारसंघ होता. तो देखील शिवसेना ठाकरे पक्षाला देण्यात आला.
यावेळी एका पदाधिकाऱ्याने नाशिक शहरात महानगरपालिका निवडणुकीचा पक्षाने अजिबात विचार केला नाही, असे सांगितले. ते म्हणाले, शहरातील तीनही जागा शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला देण्यात आल्या. देवळाली ही हक्काची आणि विद्यमान आमदार असलेला मतदारसंघ होता. तो देखील शिवसेना ठाकरे पक्षाला देण्यात आला.
शहरातील नाशिक पूर्व मतदार संघातून अन्य पक्षातून उमेदवार आयात करण्यात आला. हे सर्व करताना आगामी महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार आणि कार्यकर्ते तयार करण्याबाबत काहीही विचार झाला. नाही. त्याचा फटका येत्या काळात बसण्याची शक्यता आहे.
युवक काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांनी देवळाली मतदारसंघात अनेक उमेदवारांची संपर्क केला. या उमेदवारांकडून पैशांची मागणी करण्यात आली. एकाच वेळेस अनेक उमेदवारांकडून पैसे घेण्यात आले. या दलाल पदाधिकाऱ्यांची तक्रार वरिष्ठांकडे करण्यात आलेली आहे. त्याची चौकशी करून या पदाधिकाऱ्यांवर गंभीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. या मागणीमुळे राज्यभरातील उपस्थित पदाधिकाऱ्यांमध्ये एकच चर्चा सुरू झाली.
एकंदरच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची आढावा बैठक नाशिकच्या पदाधिकाऱ्यांनी गाजवली. या बैठकीनंतर नाशिक शहर व जिल्ह्यातील युवक काँग्रेसचे दलाल कोण? अशी चर्चा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांत होती.
या बैठकीला पक्षाचे जिल्हाध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड, गोकुळ पिंगळे, उमेदवार सुनीता चारोस्कर, माजी आमदार दीपिका चव्हाण, गणेश गीते, उदय सांगळे, लक्ष्मण मंडाले, शहराध्यक्ष गजानन शेलार, पुरुषोत्तम कडलग, अशोक पाळदे आधी उपस्थित होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.