Eknath Shinde Politics: शिंदे सेनेचा मोठा प्लॅन, २० ते २२ नगरसेवक संपर्कात?

Eknath Shinde; Shivsena Shinde Group had big plan for NMC election-महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेच्या शिंदे पक्षाने सुरू केली तयारी.
Eknath shinde
Eknath shindeSarkarnama
Published on
Updated on

Shivsena Shinde News: विधानसभा निवडणुका नंतर महायुतीला महापालिका निवडणुकीचे वेध लागले आहेत. या संदर्भात भाजपने स्वबळाचा नारा देण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाने मोठी तयारी सुरू केली आहे.

नाशिक महापालिका निवडणुकीत भाजपची सत्ता होती. त्यात मंत्री गिरीश महाजन यांचा मोठा वाटा होता. त्यामुळे हा पक्ष विद्यमान नगरसेवकांना घेऊन निवडणुकीत उतरणार आहे. अशा परिस्थितीत या पक्षाकडे नव्या इच्छुकांना संधी देण्यासाठी फारसा स्पेस नाही.

Eknath shinde
Manikrao Kokate Politics: राष्ट्रवादीकडून छगन भुजबळ यांचा विषय ‘ क्लोज’, की...?

या संधीचा अन्य पक्षांना लाभ होऊ शकतो. त्यादृष्टीने शिवसेना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पक्षाने खूप आधीच तयारी सुरू केली आहे. या दृष्टीने माजी सभागृह नेते आणि शिवसेनेचे उपनेते अजय बोरस्ते आणि महानगर प्रमुख बंटी तिदमे यांच्या संपर्कात विविध नगरसेवक असल्याचे बोलले जाते. येत्या काही दिवसात शिवसेना उद्धव ठाकरे आणि दोन्ही काँग्रेससह भारतीय जनता पक्षाचे काही नगरसेवक देखील शिवसेना शिंदे गटात प्रवेश करण्यास उत्सुक असल्याचा दावा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

Eknath shinde
Nashik Politics: नाशिक मध्येही आमदाराच्या सुरक्षा रक्षकाने रोखली पिस्तूल!

राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेविका सुषमा रवी पगारे आणि काँग्रेसचे माजी नगरसेवक जॉय कांबळे यांनी नुकताच शिवसेना शिंदे पक्षात प्रवेश केला आहे. अन्य विविध वीस ते बावीस नगरसेवक त्यांच्या संपर्कात असल्याचा दावा केला जातो. माजी नगरसेविका पगारे यांचे उपनगर परिसरातील प्रभागात संपर्क आहे. या प्रभागात माजी नगरसेविका मेघना साळवे आणि कोमल साळवे हे दोन इच्छुक आधीच सक्रिय आहेत.

माजी नगरसेविका साळवे या त्या प्रभागातील जुन्या आणि मोठ्या संपर्क असलेल्या कार्यकर्त्या आहेत. त्यांच्या उमेदवारीबाबत चर्चा होती. अशा परिस्थितीत उमेदवारी कोणाला यावरून अस्वस्थता आहे. यासंदर्भात स्थानिक नेत्यांनी जुन्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत नाशिकच्या काही पदाधिकाऱ्यांची नुकतीच बैठक झाली. यावेळी आगामी महापालिका निवडणुकीविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली. जुन्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी आपली अस्वस्थता उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे व्यक्त केली, असे कळते.

या संदर्भात उपमुख्यमंत्री शिंदे यांनी नाशिक महापालिका निवडणुकीबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. आगामी महापालिका निवडणुकीसाठी अन्य पक्षातील प्रभावी आणि चांगला संपर्क असलेल्या माजी नगरसेवकांना पक्षात आणण्यासाठी पदाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आले आहेत. नवे प्रवेश होताना जुन्या कार्यकर्त्यांना आणि सहकाऱ्यांत दुराव्याची भावना निर्माण होता कामा नये.

पक्षाच्या अडचणीच्या काळात साथ देणाऱ्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना संधी दिली जाईल. त्यांचा प्राधान्याने विचार होणार आहे. मात्र पक्षाची आगामी वाटचाल आणि विस्तारासाठी नव्या लोकांना प्रवेश द्यावेच लागतील. त्यासाठी जुन्या नव्यांचा मेळ बसविला जाईल, असे यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितल्याचे कळते.

महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी स्वबळाचा नारा दिला आहे. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक पदाधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थता आहे. विशेषता विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर सैरभैर झालेल्या काँग्रेसला संघटित करण्यासाठी सध्या तरी स्थानिक पातळीवर कोणत्याही नेत्याकडून हालचाली होताना दिसत नाही. त्याचा फायदा शिवसेना शिंदे गटाकडून घेतला जाण्याची शक्यता आहे.

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com