Suhas Kande : एकनाथ शिंदेंनी सुहास कांदेंचं बळ आणखी वाढवलं, नाशिकमध्ये मोठी जबाबदारी सोपवली, खास नवीन पदाची निर्मिती

Eknath Shinde strengthens Suhas Kande’s position in Nashik : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी आमदार सुहास कांदे यांच्या खांद्यावर महत्वाची जबाबदारी सोपवली.
Suhas Kande
Eknath Shinde, Suhas Kande Sarkarnama
Published on
Updated on

Suhas Kande : शिवसेनेचे नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास कांदे यांच्याकडे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्वाची जबाबदारी सोपवली आहे. सुहास कांदे यांची 'प्रभारी जिल्हा संघटन प्रमुख, नाशिक जिल्हा' या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे शिवसेनेत प्रथमच या पदाची निर्मिती करण्यात आली आहे.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पक्षसंघटनात्मक बांधणीसाठी शिवसेनेच्या संघटन रचनेत प्रथमच 'प्रभारी जिल्हा संघटन प्रमुख' हे पद निर्माण करण्यात आले आहे. हे पद सर्व जिल्हा प्रमुखांच्या वरच्या स्तरावरचे मानले जात आहे. स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार सुहास कांदे यांना नियुक्तीपत्र प्रदान केलं आहे.

मुंबईत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत एकनाथ शिंदे यांनी आमदार कांदे यांच्याकडे संपूर्ण जिल्ह्याची जबाबदारी सोपविण्याचा निर्णय घेतला. पुढील एक वर्षासाठी त्यांच्याकडे ही जबाबदारी असणार आहे. या वेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, शिवसेना सचिव संजय मोरे, भाऊसाहेब चौधरी, आणि राम रेपाळे, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख फरहान खान यांच्यासह अनेक नेते व पदाधिकारी उपस्थित होते.

Suhas Kande
MLA Kishor Patil : किशोर पाटील थेट वाकड्यात शिरले, भाजप आमदारासाठी 'दरवाजा बंद'

दरम्यान नियुक्तीनंतर याबाबत आमदार कांदेंनी प्रतिक्रिया दिली, ही नियुक्ती माझ्यासाठी केवळ पद नाही, तर प्रत्येक शिवसैनिकाच्या परिक्षमांचा, त्यागाचा आणि निष्ठेचा सन्मान आहे. नाशिक जिल्हा हा शिवसेनेचा गड आहे. येणाऱ्या काळात सन्मानिय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारधारेचा आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाचा आधार घेत आपण पक्ष संघटना अधिक मजबूत करू. जिल्ह्याचे नेते, संपर्क प्रमुख, जिल्हाप्रमुख व माझ्या सहकाऱ्यांच्या सोबत तळागाळातील प्रत्येक शिवसैनिकाशी थेट संपर्क ठेवून आगामी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भगवा झेंडा अधिक उंच फडकवू, हा आमचा दृढ संकल्प असेल.

Suhas Kande
Mahayuti Politics : महायुतीत पहिला मिठाचा खडा पडला ! शिंदेंच्या आमदाराने घोषणा केली, मग भाजपच्या नेत्यालाही राहवलं नाही..

शिवसेना ही सत्ता नव्हे, तर सेवा आहे; आणि सेवा हीच माझी खरी ओळख राहील. सर्व कार्यकर्त्यांच्या सहकार्याने आपण नाशिक जिल्हा हे शिवसेनेच्या संघटनशक्तीचं उदाहरण म्हणून उभं करू असं आमदार कांदे म्हणाले. तसेच त्यांनी ही जबाबदारी सोपवल्याने एकनाथ शिंदे यांचे आभार मानले. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, मंत्री दादा भुसे साहेब व उदय सामंत यांचेही आभार त्यांनी यावेळी मानले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com