

Maharashtra Politics : केंद्रातील मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहेत. त्यासाठी राजधानी दिल्लीत पडद्यामागे घडामोडी घडत आहेत.
दरम्यान, उद्धव ठाकरेंचे सहा खासदार फोडल्यानंतर एकनाथ शिंदे यांची ताकद वाढली आहे. त्यात लोकसभा मतदारसंघाची फेररचना करण्यासाठी केंद्रातील मोदी सरकारला १३१ वे घटनादुरस्ती विधेयक मंजूर करायचे आहे. त्यासाठी लोकसभेत आवश्यक असलेले दोन तृतीयांश बहुमताच्या दृष्टीने शिवसेनेचे वाढलेले खासदार महत्वाचे ठरणार आहे. त्यामुळे मंत्रिमंडळात शिंदे यांच्या शिवसेनेचा वाटा वाढण्याही शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान आता याच शक्यतेवर व केंद्रीय मंत्रिमंडळातील संभाव्य विस्तारावर शिवसेनेचे नेते व मंत्री गुलबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेनेला किती मंत्रिपदं मिळणार, याचा थेट आकडाच त्यांनी सांगितला.
गुलाबराव पाटील म्हणाले, सहा खासदारांचे पक्षांतर रीतशीर झाले असून या पक्षांतराला लोकसभा अध्यक्षांनी मान्यता दिली आहे. आमची खासदारांची संख्या आता 13 झाली आहे. शिवसेनेची ताकद वाढली असून त्यामुळे केंद्रीय मंत्रिमंडळात शिवसेनेला निश्चितच चांगले स्थान मिळेल असं गुलाबराव पाटलांनी म्हटलं आहे.
शिवसेनेला एक कॅबिनेट व एक राज्यमंत्रिपद मिळण्याची शक्यता असल्याचा दावा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केला आहे.
देवकरांच्या प्रवेशावर भाष्य
माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेवर पाटील यांनी त्यांचे नाव न घेता टीका केली. जे यापूर्वी महायुतीच्या विरोधात लढले, त्यांना पक्षात प्रवेश देण्याबाबत विचार केला पाहिजे. आमच्याकडेही पक्षप्रवेशासाठी इच्छुकांची संख्या मोठी आहे असे सूचक विधान त्यांनी केलं.
ज्यांना राजकीयदृष्ट्या अपेक्षित यश मिळत नाही, ते आपली प्रतिमा सुधारण्यासाठी पक्ष बदलतात असा टोला त्यांनी नाव न घेता देवकरांना लगावला.
पाटील-चव्हाण यांच्यातील वाद मिटवण्याचे संकेत
अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुद्द्यावरून सध्या शिवसेनेचे पाचोरा मतदारसंघाचे आमदार किशोर पाटील आणि भाजपचे चाळीसगाव मतदारसंघाचे आमदार मंगेश चव्हाण यांच्यात सुरू असलेल्या वादावर गुलाबराव पाटील यांनी भाष्य केले. या विषयावर अंतिम निर्णय महसूल मंत्री घेतील. दोन्ही आमदारांशी चर्चा करून हा वाद लवकर मिटविण्याचा प्रयत्न करू असं त्यांनी सांगितलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.