BJP Shiv Sena Politics : एरंडोलमध्ये भाजप- शिवसेनेत उमेदवारीवरुन रस्सीखेच, दोघेही वेगवेगळी चूल मांडण्याची शक्यता

BJP and Shinde Sena Likely to Contest Separately in Erandol : तालुक्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडी एकत्रितपणे लढणार असताना महायुतीत मात्र शिवसेना व भाजप हे दोन्ही पक्ष वेगवेगळी चूल मांडण्याची शक्यता आहे.
Devendra fadnavis, Eknath shinde
Devendra fadnavis, Eknath shinde sarkarnama
Published on
Updated on

Jalgaon politics : एरंडोल तालुक्यात नगरपालिका, पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या निवडणुका भाजप आणि शिवसेना स्वतंत्रपणे लढवणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. प्रत्येक प्रभाग, गट व गणात भाजप आणि शिवसेनेमध्ये इच्छुक उमेदवारांची भाऊगर्दी पाहायला मिळत आहे. इच्छुकांनी निवडणूक लढविण्यासाठीची पूर्वतयारी देखील सुरु केली आहे. परिणामी उमेदवारी देताना नेत्यांची डोकेदुखी वाढणार आहे.

तालुक्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडी एकत्रितपणे लढणार असताना महायुतीत मात्र शिवसेना व भाजप हे दोन्ही पक्ष वेगवेगळी चूल मांडण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी भाजप व शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे तालुक्यातील राजकीय समीकरणे पूर्णता बदलली आहेत.

Devendra fadnavis, Eknath shinde
India Air Strike: धक्कादायक...सीमेवर युद्धाचा तणाव, अधिकारी मात्र देवदर्शन, पंचतारांकीत पाहुणचार अन् वाइनरीत रमले!

भाजपतर्फे नगराध्यक्षपदाची निवडणूक लढविण्यासाठी चार ते पाच जण इच्छुक आहेत. तर शिवसेनेतर्फे देखील तीन जण इच्छुक असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे महायुतीतील घटक पक्ष असलेल्या भाजप व शिवसेनेतच रस्सीखेच पाहायला मिळणार आहे. कारण उमेदवारी न मिळाल्यास अपक्ष किंवा तशी वेळ आल्यास पक्षांतर करण्याची देखील तयारी ठेवल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. दरम्यान नगराध्यपदासाठी काँग्रेसतर्फे देखील दोघे इच्छूक आहेत. त्यामुळे एरंडोलमध्ये भाजप शिवसेनेत वर्चस्वाची तर महाविकास आघाडीसाठी अस्तित्व टिकवण्यासाठी लढाई होणार आहे.

नगरपालिकेवर अनेक वर्षापासून भाजपचे वर्चस्व आहे तर पंचायत समितीवर शिवसेनेचे वर्चस्व आहे. जिल्हा परिषदेच्या तीन गटांपैकी तळई- उत्राण आणि विखरण- रिंगणगाव गटावर शिवसेनेचे तर कासोदा- आडगाव गटावर भाजपचे पंधरा वर्षांपासून वर्चस्व आहे. एरंडोल तालुक्यात नगरपालिका, पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या निवडणुका भाजप आणि शिवसेना स्वतंत्रपणे लढवणार असल्याची चर्चा सुरु आहे. त्यादृष्टीने पक्ष नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली नियोजन देखील करण्यात आल्याचे दिसत आहे.

Devendra fadnavis, Eknath shinde
MIM Malegaon Politics: मालेगावात 'एमआयएम'ची पाकिस्तान मुर्दाबादची गर्जना, म्हणाले, महिलांसह भारतीय सैन्य पाकिस्तानचा दारुण पराभव करेल!

नगराध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतरच निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे. मात्र, भाजप आणि शिवसेनेत इच्छूक उमेदवारांची संख्या मोठी असल्याने महायुतीमधील दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्याची शक्यता आहे. तर महाविकास आघाडीतर्फे एकच उमेदवार निवडणूक लढविण्याबाबत नियोजन करण्यात येत आहे.

पक्षांतरामुळे तालुक्यात भाजप व शिवसेनेची ताकद वाढली असून महायुतीमधील राष्ट्रवादी, शिवसेना ठाकरे गट व कॉंग्रेसची ताकद कमी झाली आहे. काही दिवसांपू्र्वी ठाकरे गटाचे तीन माजी नगराध्यक्ष, पंचायत समितीचे दोन माजी सभापती तसेच काही प्रमुख पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये तर काहींनी शिवसेनेत प्रवेश केला.

माजी मंत्री डॉ. सतीश पाटील यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी हाती घड्याळ बांधल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अस्तित्व जवळपास संपुष्टात आले आहे. महायुतीमधील भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केल्यामुळे भाजप आणि शिवसेना निवडणुका स्वबळावरच लढविण्याबाबत नियोजन करीत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com