Nashik ISIS Connection : धक्कादायक! इसिसच्या युद्धात मरणाऱ्यांसाठी नाशिकमधून आर्थिक रसद; ATS ची कारवाई..

Nashik ATS News : यात ‘इंडियन मुजाहिद्दीन’ संघटनेचाही हात असल्याचा एसटीएसचा संशय आहे.
Nashik ISIS Connection :
Nashik ISIS Connection :Sarkarnama
Published on
Updated on

Nashik News : नाशिकमधून थेट इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँण्ड सीरीया अर्थात इसिसला आर्थिक मदत करण्यात आल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. या प्रकरणी दहशतवादी विरोधी पथकाने (एटीएस) एक इंजिनीअर तसेच उद्योजक असलेल्या तरूणास बेड्या ठोकल्यात. कोर्टाने संशयितांस सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. मृत्यू झालेल्या व्यक्तिंच्या नातलगांच्या उदरनिर्वाहाकरीता हा निधी जमा करण्यात येत होता. संशयित हा इंजिनीअर आहे. त्याच्या नावे नाशिक व इतरत्र चार-पाच कंपन्या असल्याचे चौकशीत समोर आले. (Latest Marathi News)

Nashik ISIS Connection :
Sangli NCP News : मिरजचे माजी महापौर 'अजितदादा गटात' येण्यास उत्सुक; प्रवेशापूर्वीच पडली ठिणगी!

सिरियात एका महिलेला 2019 पासून पैसे पाठवणारा हुसैफ अब्दुल अजीज शेख (वय 30, रा. एमराल्ड रेसिडेन्सी, तिडके कॉलनी) यास एटीएसने मंगळवारी रात्री बेड्या ठोकल्यात. त्याला आज नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने सात दिवसांची एटीएस कोठडी सुनावली. नाशिक शहरातून प्रथमच थेट दहशतवादी संघटनेशी संबंधित काम केल्याच्या आरोपावरून एखाद्यास अटक होण्याची ही पहिलीच वेळ असल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

एटीएसने दिलेल्या माहितीनुसार, बेकायदेशीर क्रियाकलाप (प्रतिबंध) कायद्यांतर्गत (यूएपीए) विविध कलमान्वये संशयितावर गुन्हा नोंदवण्यात आला. संशयिताला मंगळवारी (दि. 22) रात्री सव्वा आठ वाजता राहत्या घरातून अटक केली. बुधवारी (दि. 23) सायंकाळी सहा वाजता नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश मृदुला भाटीया यांच्यासमोर हजर करण्यात आले. तिथे सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी वकील अजय मिसार यांनी युक्तिवाद केला. तर विरुद्ध पक्षातून फजल सैय्यद यांनी युक्तिवाद केला. एटीएसने पुढील तपासाकरीता चौदा दिवसांची कोठडी मागितली. त्यानुसार न्यायालयाने 31 जानेवारीपर्यंत संशयिताची एटीएस कोठडी मंजूर केली आहे.

Nashik ISIS Connection :
Ahmednagar Crime News : धार्मिक स्थळाच्या कमानीचा रंग बदलण्याचा प्रयत्न, समाजकंटक पसार...

संशयिताची व्हॉटसअपद्वारे सिरीयातील एका महिलेची ओळख झाली. यात दोघांमध्ये अत्यंत सावधपणे चर्चा व्हायची. मात्र एसटीएसने ही माहिती, संदेश व आर्थिक उलाढालीचे सर्व पुरावे कोर्टासमोर मांडले. एसटीएसने आरोपीकडून सात मोबाईल, एक लॅपटॉप व पासपोर्ट जप्त केला. जवळपास पाच बँक खाते असलेल्या संशयिताचे नेहमीच श्रीलंका, दुबई, तेहरान, शारजाह आदी ठिकाणी भ्रमंती असल्याची बाब पोलिसांच्या तपासात पुढे आली.

दरम्यान, संशयिताने सिरिया येथील राबिया उर्फ उम्म ओसामा नामक महिलेच्या बँक खात्यावर विविध बँक खात्यांतून वेळोवेळी पैसे पाठविले. नाशिकच नाही तर महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा आणि बिहार राज्यातून पैसे पाठवण्यात आले. यात ‘इंडियन मुजाहिद्दीन’ संघटनेचाही हात असल्याचा एसटीएसचा संशय आहे. त्यानुसार पथक देशातील विविध ठिकाणी तपास करीत आहे. दरम्यान संशयिताने 'इसिस'ला फन्डिंग केल्याचा संशय आहे. ज्या महिलेला पैसे पाठविले, तिचे ‘आयपी ॲड्रेस लोकेशन’ सिरिया येथील आहे. त्यानुसार एटीएस सखोल तपास करीत असल्याची प्रतिक्रिया विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी सुनावणीनंतर दिली.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com