Radhakrishna Vikhe Patil:''...पण आमच्या मनातील मुख्यमंत्री फडणवीसच!''; अखेर राधाकृष्ण विखेंच्या मनातलंही आलं ओठावर

Radhakrishna Vikhe Patil Big Statement On Devendra Fadnavis CM post: कोणाच्या मनात काय चालले आहे कळत नाही....
Radhakrishna Vikhe Patil
Radhakrishna Vikhe PatilSarkarnama
Published on
Updated on

Shirdi News : मागील वर्षी राज्यात झालेल्या सत्तासंघर्षाच्या नाट्यानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळले. आणि राज्यात भाजप शिवसेना(शिंदे गट) युतीचं सरकार सत्तेत आलं. यावेळी राजकीय वर्तुळासह सर्वांनाच देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील असं ठामपणे वाटत होतं. पण एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व फडणवीस उपमुख्यमंत्री झाले. यानंतर भाजपच्या नेतेमंडळींकडून सातत्यानं शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरुन विधानं करण्यात येत आहेत.

तसेच राज्यातील युती सरकारचे नेतृत्व शिंदे करत असले तरी फडणवीस यांच्याकडेच या सरकारचा रिमोट कंट्रोल असल्याचा आरोपही विरोधकांकडून केला जातो. याचदरम्यान, आता पुन्हा एकदा भाजपच्या नेत्याकडून मुख्यमंत्रीपदावरुन मोठं विधान केलं आहे. यामुळे भाजप आणि शिंदे गटात वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे.

Radhakrishna Vikhe Patil
Ajit Pawar मुख्यमंत्री होऊ शकतात..; खडसेंनी मांडले अजितदादांच्या सीएमपदाचं गणित

देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदावरुन सर्वात प्रथम भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी"मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना आपण मनावर दगड ठेवून मुख्यमंत्री केलं असं वक्तव्य केले होते. यानंतर खासदार नवनीत राणा, दिवंगत विनायक मेटे यांच्यासह भाजपच्या नेत्यांनी फडणवीसांच्या मुख्यमंत्रीपदावर नेहमीच भाष्य केलं आहे. येत्या काळात देवेंद्र फडणवीस हेच राज्याचे नेतृत्व करतील, तेच मुख्यमंत्री होतील असा दावाही भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला होता.

याचवेळी आता भाजप नेते व महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी देखील आमच्या मनातील मुख्यमंत्री फक्त देवेंद्र फडणवीसच असल्याचं विखे पाटील विधान केलं आहे. यामुळे पुन्हा फडणवीसांच्या मुख्यमंत्रीपदावरुन राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

Radhakrishna Vikhe Patil
Amritpal Singh Surrender: खलिस्तानी समर्थक अमृतपाल सिंगची पंजाबमध्ये शरणागती; 'हे' आहे कारण?

मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी एका शिर्डी येथील एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाविषयी सूचक वक्तव्य केलं आहे. तुमच्या मनातील मुख्यमंत्री कोण? या प्रश्नाला उत्तर देताना विखे पाटील म्हणाले, 'हे स्पष्ट असून, देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) आमच्या मनातील मुख्यमंत्री आहेत. सध्याच्या आमच्या युतीच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे देखील चांगले नेते आहे.

आमच्या मनातील मुख्यमंत्री फडणवीस हेच असल्याचं विखे पाटील म्हणाले. यावेळी राष्ट्रवादीचे प्रमुख नेते असलेले शरद पवार हे संपूर्ण राज्याला संभ्रमात टाकले आहे. पण आता अजित पवार यांनी शरद पवारांना देखील संभ्रमात टाकले आहे. त्यामुळे कोणाच्या मनात काय चालले आहे कळत नाही असंही ते म्हणाले.

Radhakrishna Vikhe Patil
Satara News : शिवेंद्रसिंहराजे संतप्त : कास परिसरातील बांधकामे पाडल्यास आंदोलन करणार...

सगळ्यांसाठी ते उपमुख्यमंत्री असतील पण...; नवनीत राणांचं वक्तव्य

"देवेंद्र फडणवीस यांचं जिथे जिथे पाऊल पडलं मग गुजरात असो वा गोवा तिथे भारतीय जनता पक्षाला नेत्रदीपक यश मिळालं. फडणवीस यांचं काम बोलतं. त्यांच्या कामाची स्टाईल धडाकेबाज आहे. त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा डंका महाराष्ट्रात तर वाजतोच आहे, पण इतर राज्यातही त्यांच्या कामाची चर्चा होते. सगळ्यांसाठी ते उपमुख्यमंत्री असतील पण आमच्या मनातील मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीसच आहेत", अशी मन की बात अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी सांगितली.

Radhakrishna Vikhe Patil
Maratha Reservation : आरक्षणासाठी मराठा समाज पुन्हा आक्रमक; महाराष्ट्र दिनापासून घेणार 'हा' निर्णय

चंद्रकांत पाटील काय म्हणाले होते ?

केंद्रातील नेत्यांनी आदेश दिला आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झाले आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाले. मनावर दगड ठेवून आपण सर्वांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांना मुख्यमंत्री केलं. आपल्याला दुःख झालं. पण आपण दुःख पचवून पुढे गेलो कारण आपल्याला गाडा पुढे हाकायचा होता असं पाटील मागील वर्षी पनवेल येथील भाजपच्या कार्यकारिणीच्या बैठकीत केलं होतं.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com