धक्कादायक...मला ‘ड्रग माफिया’ घोषित करून तुरुंगात टाकणार होते!

गिरीश महाजन यांनी धक्कादायक दावा करत ‘त्या’ रेकॉर्डिंगची ‘सीबीआय’ चौकशीची मागणी केली.
Girish Mahajan
Girish MahajanSarkarnama
Published on
Updated on

जळगाव : आपल्या वाहनात ड्रग टाकायचे ते पकडायचे आणि आपल्याला ‘ड्रग माफिया’ (Drug Mafia) म्हणून घोषित करून तुरुंगात टाकायचे, असे एखाद्या साउथ इंडियनच्या चित्रपटाला लाजवेल, असे षडयंत्र आपल्या विरुद्ध करण्यात आले होते. त्याबाबत झालेल्या रेकॉर्डिंगमुळे त्यांचा उलगडा झाला आहे. त्याची चौकशी आता ‘सीबीआय’कडे (CBI) देण्यात आली आहे. आता दूध का दूध आणि पाणी का पाणी दिसून येईल, असा दावा माजी मंत्री व भाजप (BJP) आमदार गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी केला.Girish Mahajan made alligation on police)

Girish Mahajan
सत्ता असो वा नसो, विकासात खंड पडणार नाही!

महाजन म्हणाले, की महाविकास आघाडी सरकार असताना चंद्रशेखर बावनकुळे तसेच अनेक भाजप नेत्यांना षडयंत्र करून फसविण्याचा हा डाव होता. मला तर ‘ड्रग माफिया’ दाखवून थेट दोन वर्षे तुरुंगात टाकण्याचा डाव तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या माध्यमातून करण्यात येत होता.

Girish Mahajan
सत्तांतराचे परिणाम... चांगल्या अधिकाऱ्यांच्याही होताहेत बदल्या!

ते म्हणाले, माझ्या विरुद्ध धमकी दिल्याचा गुन्हा पुण्यापासून पाचशे किलोमीटरवर असलेल्या एका गावात दाखल करण्यात आला. त्यातही पोलिसांवर दबाव आणण्यात आला. त्यानंतर विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी आपल्याला विविध गुन्ह्यांत अडकविण्याचा कट रचला होता. याबाबत प्रवीण चव्हाण यांच्या कार्यालयात कोणी तरी रेकॉर्डिंग केले आणि देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते असताना त्यांनी विधिमंडळात ही रेकॉर्डिंग सादर करून हे सर्व उघडकीस आणले.

महाजन यांनी दावा केला की, यात गिरीश महाजन यांना राजकीय जीवनातून संपवायचे, त्यानंतर देवेंद्र फडणवीस संपतील आणि भाजप आपोआप संपेल, असा हा डाव होता. मात्र तो सर्व रेकॉर्डिंगमुळे उघडकीस आला. हे प्रकरण चौकशीसाठी ‘सीबीआय’कडे द्यावे, अशी मागणी आम्ही केली होती. मात्र महाविकास आघाडी सरकारने ते पोलिसांकडे दिले. त्या विरोधात आम्ही न्यायालयात गेलो, आता आमचे सरकार आले आहे, आम्ही ही सर्व चौकशी ‘सीबीआय’कडे दिली आहे. त्यामुळे याची संपूर्ण चौकशी होईल, त्या रेकॉर्डिंगमध्ये ज्यांची नावे आहेत, त्यांचीही चौकशी होईल व त्यातून संपूर्ण सत्य बाहेर येईल.

----

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com