Girish Mahajan : बिहारचा निकाल बघून गिरीश महाजनांचा कॉन्फिडन्स वाढला, नाशिकमध्ये सगळे रेकॉर्ड तोडणार

Girish Mahajan On Bihar results : बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठे यश मिळाले. महाराष्ट्रातही भाजपने हा जल्लोष साजरा केला. भाजप नेत्यांचा कॉन्फिडन्स या निकालामुळे चांगलाच वाढलेला दिसतोय.
Girish Mahajan nashik
Girish MahajanSarkarnama
Published on
Updated on

Nashik Politics : बिहार विधानसभा निवडणुकीत 'एनडीए' ला मोठे यश मिळाले. भाजपचे कमळ ८९ जागांवर फुललं त्यामुळे भाजप मोठा भाऊ ठरला. बिहारच्या निकालाने महाराष्ट्रातही भाजप नेत्यांचा कॉन्फिडन्स वाढल्याचं दिसत आहे.

बिहार निकालावर काल मंत्री गिरीश महाजन यांनी माध्यमांशी संवाद साधला. बिहारमध्ये लागलेल्या निकाल अभूतपूर्व असून, असा निकाल यापूर्वी महाराष्ट्रातही लागला होता. बिहार प्रमाणे महाराष्ट्रातही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपला मोठे यश मिळाले असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

काल शिवसेना ठाकरे गटाचे हेमंत वाजे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या प्रवेश सोहळ्यानंतर महाजन बोलत होते. विधानसभेला जसे अभूतपूर्व यश आपल्याला मिळालं तसच यश स्थानिक निवडणुकांमध्ये मिळणार आहे. नाशिक महापालिका निवडणुकीत तर मागचे पुढचे सगळे रेकॉर्ड आपल्याला तोडायचे आहेत अस गिरीश महाजन म्हणाले. शंभरच्यावरच नगरसेवक निवडून आणायचे असल्याचे महाजन म्हणाले.

Girish Mahajan nashik
BJP Politics : भाजप आता मालेगावातही धमाका करण्याच्या तयारीत, एकनाथ शिंदेंचे मंत्री दादा भुसेंचं टेन्शन वाढलं..

यावेळी महाजन यांनी कॉंग्रेसच्या परिस्थितीवर भाष्य केलं. कॉंग्रेस हे भरकटलेले जहाज असून कॉंग्रेसला कोणतीही विचारधारा नाही. घराणेशाहीत अडकलेला पक्ष असून गांधी परिवाराच्या बाहेर तो जातच नाही. राहुल गांधी यांच्या सारखे नेतृत्व असल्यावर असेच होणार. कॉंग्रेसचा सुपडा साफ झाला आहे. एमआयएम सुद्धा त्यांच्या पुढे गेली आहे असा टोला महाजनांनी लगावला.

खासदार संजय राऊत यांच्या विधानाचाही त्यांनी खरपूस समाचार घेतला. निर्लज्जपणालाही लाज असते. संजय राऊत यांना लाज-शरम राहिलेली नाही. लोक त्यांना विचारतही नाहीत. पुढील निवडणुकीत ते हरतील, म्हणून आधीच रडायला कारणे शोधत आहेत.

Girish Mahajan nashik
Rajabhau Waje : खासदार वाजेंना कोकाटेंशी सलगी करणं भोवतंय, काकांनी म्हणूनच साथ सोडली? सिन्नरमध्ये वेगळ्याच चर्चा..

मतदार याद्या फॉल्टी असल्याचा आरोप त्यांनी फेटाळला. ते म्हणाले विरोधकांना फक्त रडायला काहीतरी कारण लागतं. भाजपच्या मतदारांची नावे दुबार नाही. महाराष्ट्रात सुफडा साफ होणार असल्याने ते रडत आहेत..बिहारचा निकाल अभूतपूर्व असून ही भाजपची त्सुनामी आहे. असं म्हणत निकालाचे श्रेय त्यांनी पंतप्रधान मोदी यांना दिलं.

तसेच देवेंद्र फडणवीस यांचा बिहारमधील प्रचार निर्णायक ठरल्याचा दावा महाजन यांनी केला. देवाभाऊ सगळ्या मतदारसंघात फिरले. आम्हीही गेलो असतो तर दोन-पाच जागा जास्त आल्या असत्या. १०० टक्के जागा आल्या असत्या असं महाजन म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com