Girish Mahajan Politics: मंत्री गिरीश महाजन यांच्या विरोधात राष्ट्रवादीची छुपी यंत्रणा सक्रिय?

Eknath Khadse Politics, NCP's covert politics against Minister Girish Mahajan-जामनेर मतदारसंघात इच्छुक वेगळे आणि खरे उमेदवार वेगळेच असल्याची चर्चा.
Eknath Khadse & Girish Mahajan
Eknath Khadse & Girish MahajanSarkarnama
Published on
Updated on

Khadse Vs Mahajan News: जळगाव जिल्ह्याच्या विधानसभा निवडणुकीचे राजकारण तापल्याने सध्या त्याला राजकीय उकळ्या फुटत आहे. प्रत्येकाने एक छूपी यंत्रणा सक्रिय केली आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवार वेगळे आणि प्रत्यक्ष उमेदवारी मिळणारे वेगळेच अशी स्थिती आहे.

भारतीय जनता पक्षाची सर्व सूत्रे जळगाव जिल्ह्यात राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे एकवटलेली आहेत त्यामुळे भाजपसह भाजप विरोधकांचे गिरीश महाजन यांच्यावर बारीक लक्ष आहे. या दृष्टीने महाविकास आघाडीने मंत्री महाजन यांना टार्गेट केले आहे.

विशेष म्हणजे यामध्ये भारतीय जनता पक्षाचा एक मोठा गट पडद्यामागून सक्रिय आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने काल जळगाव जिल्ह्यातील सर्व ११ विधानसभा मतदारसंघातील आपल्या २९ इच्छुकांची नावे जाहीर केली आहेत.

यामध्ये जामनेर विधानसभा मतदारसंघात वंदना अशोक चौधरी आणि विश्वनाथ पाटील हे इच्छुक आहेत. त्यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. पक्षाने त्यांचे नाव राज्याच्या समितीकडे पाठविले आहे. हे दोन्ही इच्छुक उमेदवार डमी असल्याचे चर्चा सुरू आहे.

Eknath Khadse & Girish Mahajan
Manoj Jarange Politics: शिंदे गटाचे आमदार किशोर दराडे पडले ‘जरांगे फॅक्टर’ च्या मोहात?

ग्रामविकास मंत्री महाजन यांच्या विरोधात महाविकास आघाडी देखील तेवढ्याच प्रबळ उमेदवार देण्याच्या तयारीत आहे. या उमेदवाराला महाविकास आघाडी बरोबरच मंत्री महाजन यांच्या निकटवर्तीयांचीही मदत मिळेल, अशी व्यवस्था करण्यात आली आहे.

जळगावचे दिसणारे आणि असणारे यंदा राजकारण वेगळे आहे. यामध्ये काय घडते आहे याची उत्सुकता पक्षाचे पदाधिकारी, इच्छुक उमेदवार आणि कार्यकर्त्यांना देखील आहे. मतदारांमध्ये हा विशेष चर्चेचा विषय ठरला आहे.

मंत्री महाजन यांनी गेल्या दहा वर्षाच्या भारतीय जनता पक्षाच्या राज्यातील सत्ता काळात अनेक धडाडीचे निर्णय घेतले. यामध्ये पक्षातील आणि पक्षाबाहेरच्या विरोधकांचे खच्चीकरण करण्यात त्यांनी कसूर केला नाही. सध्या देखील ते आपल्या विरोधकांबाबत अतिशय आक्रमक आहेत.

Eknath Khadse & Girish Mahajan
Dilip Bankar Politics: भाजप, दिलीप बनकर वादात शरद पवार फॅक्टर निफाडमध्ये निर्णायक ठरणार?

पक्षातील अनेक इच्छुक आणि महत्त्वाचे लोक त्यामुळे दुखावलेले आहेत. या दुखावलेल्या नेत्यांनी विरोधकांना रसद पुरविण्याचे काम सुरू केले आहे. हे लपून राहिलेले नाही. मंत्री महाजन यांच्या वाटेत हे न दिसणारे गतिरोधक मोठी राजकीय समस्या निर्माण करू शकतात.

जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याच्या मार्गावरून आता यु टर्न घेतला आहे. त्यांच्या कन्या रोहिणी खडसे मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या इच्छुक उमेदवार आहेत.

त्यामुळे श्री खडसे यांची सबंध ताकद आणि कौशल्य कन्येच्या मुक्ताईनगर मतदारसंघा एव्हढेच मंत्री महाजन यांच्या जामनेर मतदारसंघात देखील पणाला लागणार आहे. या दृष्टीने सगळ्यांचीच पावले पडत आहेत. त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक चर्चेचा आणि राजकीय संघर्ष हा ग्रामविकास मंत्री महाजन यांच्या जामनेर आणि श्री खडसे यांच्या कन्या आणि राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे उमेदवार असणाऱ्या मुक्ताईनगर मतदारसंघात असेल.

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com