Girish Mahajan Politics: भाजप, एकनाथ शिंदे यांच्या भांडणात नाशिकचा कारभार पालकमंत्र्यांना!

BJP and Eknath Shinde conflict in Nashik: भाजप आणि एकनाथ शिंदे गटातील मतभेदांच्या चर्चेदरम्यान नाशिकच्या कारभारात पालकमंत्र्यांची भूमिका महत्त्वाची ठरत आहे. गिरीश महाजन यांच्याभोवती वाढलेल्या राजकीय घडामोडी जाणून घ्या.
Maharashtra political developments involving Girish Mahajan
Maharashtra political developments involving Girish MahajanSarkarnama
Published on
Updated on

Girish Mahajan News: नाशिक जिल्ह्याला कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांची पालकमंत्री पदी नियुक्ती झाली होती. मात्र नियुक्ती झाल्यावर 24 तासांतच त्याला स्थगिती देण्यात आली. मुख्यमंत्र्यांना आपल्या विश्वासू मंत्र्याची नियुक्ती अद्यापही पुन्हा करता आलेली नाही.

नाशिक जिल्हा नियोजन मंडळाचा कारभार गेली दोन वर्ष जिल्हाधिकारी पाहत आहेत. यंदाही 960 कोटींचा नियोजन मंडळाचा निधी वितरणाचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी यापूर्वीच घेतला आहे. त्यामुळे सत्ताधारी आमदारांना आपल्या आवडीच्या कामांना मुरड घालावी लागल्याचे चित्र आहे.

महायुतीची सत्ता असल्याने राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये पालकमंत्र्यांची वाटणी करण्यात आली आहे. नाशिक आणि रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री पद महायुतीच्या कोणत्या घटक पक्षाला यावरून मोठा मतभेद आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या दोन्ही जिल्ह्यांच्या नियुक्ती त्यांना त्यामुळेच परदेशात असताना स्थगिती मिळविली होती.

नाशिकला गिरीश महाजन यांना पालकमंत्री पद देण्यात आले होते. त्यामुळे भाजपच्या पाचही आमदारांना मोठा दिलासा मिळाला होता. मात्र रायगडचे पालकमंत्री पद कोणाला यावरून शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाने नाशिकचा हट्ट धरला होता. हा वाद ‌अद्यापही कायम आहे.

Maharashtra political developments involving Girish Mahajan
Ketan Agrawal murder case Beed connection : केतन अगरवाल हत्या प्रकरणात पहिल्यांदाच बीड कनेक्शन : चेतनच्या तोंडून आणखी एका आरोपीचं नाव समोर

जिल्ह्यात १५ पैकी १४ आमदार सत्ताधारी महायुतीचे आहेत. मालेगाव शहरातील मौलाना मुफ्ती इस्माईल हे एकमेव आमदार एमआयएम पक्षाचे आहेत. महायुतीच्या हिंदुत्ववादी राजकारणामुळे सत्तेत स्थान देण्यात आलेले नाही, अन्यथा या पक्षाचे आमदारही भाजप सरकारला अनुकूल अशीच भूमिका घेत आले आहेत.

जिल्ह्यात भाजपचे पाच आमदार आहेत. सर्वाधिक सात आमदार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे आहेत. शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे अवघे दोन आमदार असून त्यातील दादा भुसे हे शिक्षण मंत्री आहेत. संख्याबळानुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व असल्याने ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ हे देखील पालकमंत्री पदाचे दावेदार आहेत.

महायुतीतील तिन्ही पक्षांमध्ये वर्चस्ववादाचा राजकीय तिढा आहे. रायगडचे पालकमंत्री पद राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाला दिल्याने हा वाद निर्माण झाला होता. रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री पद शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे भरत गोगावले यांना हवे आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत वाद आहे. त्याचा फटका नाशिकच्या गिरीश महाजन यांच्या नियुक्तीला बसला आहे.

Maharashtra political developments involving Girish Mahajan
ACB Raid : जळगावातील त्या लाचखोर मुद्रांक अधिकाऱ्याच्या घरात नेमकं काय दडलंय? ACB कडून गोपनीय झाडाझडती

आणि दोन वर्ष त्यातून अद्यापही मार्ग निघालेला नाही. सध्या कुंभमेळ्याची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. त्यामुळे नाशिकचे पालकमंत्री पद अन्य कोणाला देण्याऐवजी रिक्त ठेवणे भाजपच्या सोयीचे आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अन्य दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या अजेंड्यावर हा विषय आता प्राधान्याचा राहिलेला नाही. त्याचा फटका सत्ताधारी आमदारांना बसत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com