Girish Mahajan : एक फोन अन् मंत्री गिरीश महाजनांचा ताफा अचानक साताऱ्याच्या दिशेने : वाट वाकडी करून घेतली 'खास भेट'

Girish Mahajan meets Udayanraje Bhosale : भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन यांनी पुण्याला आले असताना आपला ताफा थेट साताऱ्याच्या दिशेने वळवला आणि खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेतली.
Girish Mahajan meets Udayanraje Bhosale at Jalmandir Palace in Satara
Girish Mahajan meets Udayanraje Bhosale at Jalmandir Palace in SataraSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Politics : भाजपचे संकटमोचक म्हणून ओळख असलेल्या जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी गुरुवारी अचानक साताऱ्यात जाऊन भाजप खासदार उदयनराजे भोसले यांची खास भेट घेतली. उदयनराजे यांच्या 'जलमंदिर पॅलेस' येथे दोघांमध्ये जवळपास अर्धा तास बंद दाराआड चर्चा झाल्याने राजकीय वर्तुळात या भेटीची चांगलीच चर्चा रंगली.

मंत्री महाजन हे गुरुवारी (दि. ९) कामानिमित्त पुण्यात आले होते. काम आटोपल्यानंतर त्यांचा ताफा अचानक साताऱ्याच्या दिशेने वळाला. ते पुण्याहून थेट साताऱ्यात दाखल झाले. 'जलमंदिर पॅलेस' येथे त्यांनी उदयनराजे यांची भेट घेत दिलखुलास गप्पा मारल्या. यावेळी त्यांनी कल्पनाराजे भोसले यांचीही भेट घेतली.

दोघांमधील या भेटीनंतर माध्यम प्रतिनिधींनी मंत्री महाजन यांना बोलतं केलं. ही राजकीय भेट होती का असं विचारलं. यावेळी त्यांनी सांगितले की, पुण्याला आल्यानंतर राजेंशी फोनवर संपर्क साधला आणि ते साताऱ्यात असल्याचे समजताच त्यांना भेटण्यासाठी येथे आलो. खासदार उदयनराजे भोसले आणि आमचे पारिवारिक संबंध आहेत. ही भेट राजकीय नसून दिल्लीपासून गल्लीपर्यंत अलबेल आहे, असे सूचक विधान महाजन यांनी केलं व अधिक बोलण टाळलं. त्यांनी ही केवळ एक सदिच्छा भेट असल्याचं स्पष्ट केले.

Girish Mahajan meets Udayanraje Bhosale at Jalmandir Palace in Satara
Amit Shah BJP Manifesto : ममता बॅनर्जींच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडण्यासाठी भाजप सज्ज; 'या' 5 घोषणा ठरणार गेम चेंजर!

माध्यम प्रतिनिधींनी मंत्री गिरीश महाजन यांना विचारलेल्या राजकीय चर्चेच्या प्रश्नाला उत्तर देताना उदयनराजे यांनी मात्र, आपल्या खास शैलीत मिश्किल विधान केलं. उदयनराजे म्हणाले, आमच्यामध्ये कॉलेजच्या जुन्या आठवणींबाबत चर्चा झाली, आता त्या नेमक्या कोणत्या होत्या हे विचारू नका आणि मी त्या सांगणारही नाही,' अशी टीपण्णी खासदार उदयनराजे यांनी केली.

Girish Mahajan meets Udayanraje Bhosale at Jalmandir Palace in Satara
Nashik News : नाशिकमध्ये PM मोदींच्या ड्रीम प्रोजेक्टचे काम एका झेरॉक्स नगरसेवकाने बंद पाडले : आयुक्त मनिषा खत्रींकडून तातडीने दखल

दरम्यान एकीकडे मंत्री महाजन यांनी ही भेट वैयक्तिक असल्याचे सांगितले असले, तरी उदयनराजेंनी मात्र आपल्या शैलीत मिश्कील टोलेबाजी केल्याने संशयाला जागा निर्माण झाली. कारण राज्याच्या राजकारणातील दोन दिग्गज नेत्यांमध्ये झालेली ही चर्चा केवळ सदिच्छा आहे की, त्यामागे काही राजकीय हेतु आहे, याबाबत आता राजकीय वर्तुळात चर्चांणा उधाण आलं आहे.

मात्र दुसरीकडे, मंत्री महाजन यांनी या भेटीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले असून सातारा जिल्ह्यासह महाराष्ट्रातील सामाजिक व राजकीय क्षेत्रातील विविध विषयांवर चर्चा झाल्याचे म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com