

Maharashtra politics : भाजपचे संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे काही दिवसांपूर्वी एका तरणीसोबतचे कथित आक्षेपार्ह फोटो व्हायरल झाले होते. ज्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. तर यावरून स्वत: महाजन यांनी समोर येत खुलासा केला होता. दरम्यान या प्रकरणी जळगाव पोलिसांनी गुन्हा नोंदविला होता. आता या प्रकरणात जळगाव सायबर पोलीस ठाण्याच्या पथकाने मोठी कारवाई केली असून एकाला बेड्या ठोकल्या आहेत. जळगाव पोलिसांनी पुण्यात जावून ही कारवाई केली असून भरत बालाजी म्हस्के (वय ३४, रा. गोंदी खुर्द, ता. गेवराई, जि. बीड) असे संशयिताचे नाव आहे. त्याला इंदापूर (जि. पुणे) येथून ताब्यात घेतले आहे.
राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे एका महिलेसोबतचे कथित आक्षेपार्ह फोटो १९ जून २०२६ रोजी सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. ज्यानंतर महाजन यांनी हे फोटो पूर्णपणे बनावट आणि मॉर्फ केलेले असल्याचे स्पष्टीकरण दिले होते. तसेच या प्रकरणी तक्रार दाखल करणार असल्याचे सांगितले होते. ज्यानंतर जळगाव सायबर पोलिस ठाण्यात या प्रकरणी नगरसेवक अरविंद भगवान देशमुख यांनी तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवरून सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला होता.
आता या प्रकरणात जळगाव शहरातील सायबर पोलीस ठाण्याच्या पथकाने संशयित फेसबुक खातेधारकाला पुणे जिल्ह्यातू अटक केली आहे. संबंधिताचा मोबाइलही जप्त करण्यात आला आहे. त्यामुळे मंत्री महाजन यांची बदनामी केल्याच्या प्रकरणात दाखल गुन्ह्याच्या तपासाला आता आणखी गती मिळणार आहे. भरत म्हस्के असे संशयिताचे नाव असून संशयिताने वापरलेला सुमारे ३० हजार रुपये किंमतीचा मोबाईल देखील जप्त करण्यात आला आहे. यासंदर्भात लवकरच न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली आहे.
या प्रकरणात चौकशीदरम्यान संशयिताने संबंधित पोस्ट स्वतः केल्याची कबुली दिल्याचेही पोलिसांनी सांगितले असून पोलिसांनी मोबाईल जप्त केला आहे. पोलिसांनी संशयिताला भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (बीएनएसएस) कलम ३५ (३) अन्वये नोटीस बजावली असून, तपास पूर्ण करून त्याच्याविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात येणार आहे.
गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपास करत संशयिताला पुण्यात बेड्या ठोकल्या असून यापूर्वीच ‘सहयोग’ पोर्टलच्या माध्यमातून फेसबुकवर केलेले तरणीसोबतचे कथित आक्षेपार्ह फोटो हटविण्यात आले होते. तसेच संशयिताचे फेसबुक खातेही कायमस्वरूपी निलंबित करण्यात आले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.