Girish Mahajan News: कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्याशी संबंधित आक्षेपार्ह व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाले आहेत. हे व्हिडिओ वेगाने व्हायरल होत असल्याने तो चर्चेचा विषय आहे. त्यावर मंत्री गिरीश महाजन यांनीही पोलिसात तक्रार करणाऱ्या असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांचे काही आक्षेपार्ह व्हिडिओ सध्या फेसबुक आणि समाज माध्यमांवर व्हायरल होत आहेत. काही छायाचित्रेही त्यावर टाकण्यात आली आहेत. त्यामुळे मंत्री महाजन यांचे भाजप पक्षातील समर्थक आणि विरोधक यांच्यात तो चर्चेचा विषय बनला आहे.
हे व्हिडिओ मार्च केलेले आणि एआय जनरेटेड असल्याचा दावा मंत्री महाजन यांनी केला आहे. त्या व्हिडिओशी आपला काहीही संबंध नाही. या व्हिडिओ आणि छायाचित्रांची चौकशी करण्यात यावी, असे मंत्री महाजन यांनी म्हटले होते.
मात्र राजकीय नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये त्याच्या तीव्र प्रतिक्रिया उमटले आहेत. त्यामुळे नाशिकला महाजन समर्थक नगरसेवकांनी संताप व्यक्त केला. बाबत काही नगरसेवकांनी थेट पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्यामुळे एकच खळबळ उडाली.
एवढ्यावरच न थांबता महाजन यांच्या समर्थक नगरसेवकांनी काल शहराच्या पोलिस आयुक्तांशी संपर्क केला. यासंदर्भात व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या समाजकंटकांवर कारवाई करण्यात यावी. त्यांचा शोध घेऊन अटक करण्यात यावी, अशी मागणे या नगरसेवकांनी केली आहे.
पोलीस आयुक्तांनी याबाबत सायबर शाखेला सूचना केले आहेत. त्यानुसार थेट फेसबुकला नोटीस देण्यात आली आहे. गावठी चाणक्य आणि ऑल अबाउट महाराष्ट्र या फेसबुक पेजवरून हा बदनामीकारक आणि वादग्रस्त मजकूर व्हायरल करण्यात आला आहे. फेसबुक वरील हा मजकूर तातडीने हटविण्याची मागणी ही करण्यात आली.
पोलिसांनी याबाबत वरिष्ठ स्तरावरून फेसबुकला संपर्क केला आहे. हे व्हिडिओ एआय जनरेटेड असल्याचा दावा भाजप समर्थक नगरसेवकांनी केला. कुंभमेळा मंत्री महाजन यांनीही यापूर्वी असाच दाबा केला होता. त्यामुळे व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांची चौकशी आणि तपास पोलिसांनी सुरू केला आहे.
----
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.