Girish Mahajan : मंत्री गिरीश महाजनांनी महिला दिनी मन जिंकलं, खऱ्या अर्थाने संकटमोचक शोभले... नेमकं काय घडलं?

Girish Mahajan stops his convoy : रस्त्यावर पडलेली महिला, थांबला मंत्र्यांचा ताफा…गिरीश महाजनांनी जे केलं ते पाहून नागरिकही झाले भावूक, खऱ्या अर्थाने संकटमोचक म्हणून ओळख अधोरेखित केली.
Girish Mahajan Help Women
Girish Mahajan Help WomenSarkarnama
Published on
Updated on

Nashik News : दरवर्षी 8 मार्च रोजी जागतिक महिला दिन साजरा केला जातो. आजही जागतिक महिला दिनानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हा दिवस महिलांच्या कर्तृत्वाचा, त्यांच्या संघर्षाचा आणि समाजातील त्यांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी समर्पित असतो. महिलांप्रती प्रेम, आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीचा हा दिवस असतो. आजच्या दिवशी, राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी अपघातग्रस्त महिलेला तत्काळ मदतीचा हात देऊन पुन्हा एकदा 'संकटमोचक' म्हणून आपली ओळख अधोरेखित केली.

मंत्री गिरीश महाजन हे भाजपचे जेष्ठ नेते असून भाजपमध्ये त्यांना संकटमोचक म्हणून ओळखले जाते. उत्तर महाराष्ट्रात भाजपची संघटना मजूबत करण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. सध्या कुंभमेळा मंत्री म्हणून ते काम बघत असून त्यानिमित्ताने ते सातत्याने नाशिकमध्ये येत असतात. आजही रविवार (दि. ८) मंत्री गिरीश महाजन हे नाशिकमध्ये होते.

सकाळच्या सुमारास मंत्री महाजन हे जळगाव येथून रेल्वेने नाशिकला पोहोचले. नाशिक रेल्वे स्थानकावरुन ते शहरात येत होते. त्याचवेळी उपनगर सिग्नलला एका महिलेला अचानक चक्कर आल्याने ती रस्त्यावर पडली होती. आसपासचे नागरिक तिथे जमा झाले होते. त्यावेळी मंत्री महाजन यांच्या वाहनाचा ताफा तेथून जात होता. महाजन यांनी ते दृश्य पाहाताच तत्काळ आपला ताफा थांबवला आणि स्वत: त्या महिलेजवळ जाऊन तिची काळजीने विचारपूस केली.

Girish Mahajan Help Women
Girish Mahajan : आमदार रोहित पवारांना भाजपने घेरलं; आता संकटमोचक गिरीश महाजनांनी केला पलटवार, जय पवारांवरही बोलले

संबधित महिला चालू गाडीवर चक्कर येऊन पडल्याचे कळताच महाजन यांनी महिलेला काही दुखापत तर नाही ना झाली अशी विचारणा केली. तत्काळ आपल्याच वाहनातून पाण्याची बॉटल मागवत महिलेला पाणी देखील दिले. महिलेला रुग्णालयात नेण्याबाबत विचारपूस केली, मात्र किरकोळ लागले असल्याचे महिलेने सांगितले. महाजनांनी तिथे जमलेल्या लोकांनाही मदतीचे आवाहन केले. मंत्री ‌महाजन यांनी आपुलकीने साधलेला संवाद पाहात महिलेलाही दिलासा मिळाला. (Nashik News)

Girish Mahajan Help Women
Nashik Crime : वारंवार गुंगारा देणारा ‘पुष्पा’ अखेर जाळ्यात; नाशिक न्यायालयाच्या आवारातच वनपथकाने ठोकल्या बेड्या

दरम्यान संकटमोचक महाजन अशी ओळख असलेल्या महाजन यांची ही तत्परता पाहून नागरिकांनी देखील मंत्री महाजन यांच्या भूमिकेचे कौतुक केले. मंत्री गिरीश महाजन हे संकटाच्या प्रसंगी तात्काळ मदतीसाठी पुढे सरसावणारे नेते म्हणून ओळखले जातात. विशेष म्हणजे आज जागतिक महिला दिन असल्याने या घटनेला अधिक भावनिक स्पर्श मिळाला. खऱ्या अर्थाने महाजन हे संकटमोचक शोभतात अशी चर्चा उपस्थितांमध्ये झाली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com