Manisha Kayande News : भाजपमध्ये असतानाही नेहमीच शिवसेनेचं काम केलं; असं का म्हणाल्या मनिषा कायंदे

Uddhav Thackeray Shivsena : महाविकास आघाडीत मन मारून काम करण्याची वेळ
Manisha Kayande, Shivsena, Shivsena (UBT), BJP
Manisha Kayande, Shivsena, Shivsena (UBT), BJPSarkarnama
Published on
Updated on

Manisha Kayande On Thackeray's Shivsena : ठाकरे गटाच्या विधान परिषदेच्या आमदार मनिषा कायंदे यांनी रविवारी (ता. १८) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. पक्ष प्रवेशानंतर शिंदे यांनी मनिषा कायंदे यांची पक्षाच्या सचिवपदी नियुक्ती केली. दरम्यान, सोमवारी (ता. १९) आपण आताही शिवसेनेतच आहोत. पक्षांतर केले नाही. भाजपमध्ये असल्यापासून शिवसेनेचे काम करत असल्याचा गौप्यस्फोटही कायंदे यांनी यावेळी केला आहे. (Latest Marathi News)

Manisha Kayande, Shivsena, Shivsena (UBT), BJP
Manisha Kayande On Thackeray Group: मनिषा कायंदेंचा ठाकरे गटावर निशाणा; म्हणाल्या, "पक्षात घुसमट..."

मनिषा कायंदे यांनी सोमवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी आपण ठाकरे गट सोडल्याची काही कारणे स्पष्ट केली. तसेच विधान परिषदेचे सदस्य केल्यामुळे त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आभारही मानले. यावेळी कायंदे यांनी आपण कुठलाही पक्षप्रवेश केला नसून शिवसेनेतच आहोत. शिवसेनेत फक्त नेतृत्व बदल झाला आहे, हे मान्य. खरी शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. आपली वैचारिक घुसमट होत होती, याची प्रखर जाणीव झाल्यानेच आपण ठाकरे गट सोडण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, वयाच्या १८ व्या वर्षापासून मी शिवसेनेलाचे मतदान केले. भारतीय जनता पक्षात असले तरी मी नेहमीच निवडणुकीवेळी शिवसेनेचे काम केल्याचेही कायंदे यांनी यावेळी स्पष्ट केले.

मनिषा कायंदे म्हणाल्या, "मुंबईच्या मध्य दक्षिण लोकसभा मतदारसंघातून मी येते. तो शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. येथून नारायणराव आठवले मध्य दक्षिण विभागातून शिवसेनेच्या तिकिटावर खासदार झाले. त्यानंतर मनोहर जोशी, विद्यमान खासदारांच्या दोन टर्म असा पूर्ण काळ होता. त्यामुळे भाजपात असले तरी निवडणुकीवेळी सातत्याने शिवसेनेचेच काम केले आहे. शिवसेनेची व भाजपाची विचारधारा एकसारखीच होती. त्यामुळे भाजपातून शिवसेनेत आले तेव्हा माझी विचारधारा तीच राहिली."

Manisha Kayande, Shivsena, Shivsena (UBT), BJP
Fake Major Arrest in Pune : पुण्यात तोतया मेजरला अटक; लष्कराच्या गुप्तचर विभागाची कारवाई

यावेळी कायंदे यांनी महाविकास आघाडीत काम करताना वैचारिक घुसमट होत असल्याची कबुली दिली. त्या म्हणाल्या, "राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना एकत्र येत महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. हे विभिन्न विचाराचे पक्ष एकत्र आल्याने काम करताना अडचणी येत होत्या. महाविकास आघाडीतील विचारधारा विभिन्न आहेत. इच्छा नसतानाही पक्षप्रमुखांचे आदेश मान्य करत होते. मात्र आता पाणी डोक्यावरून जायला लागले. स्वातंत्र्यवीर सावकर व इतर अनेक मुद्द्यांवरून ठाकरे शिवसेनेला बाजू मांडले जड जाऊ लागले. यातून हिंदुत्वाच्या विचारधारेपासून आपण दिवसेंदिवस दूर जात असल्याची जाणीव झाली."

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com