

Nashik MLC Election : नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधानपरिषद निवडणुकीत विजय मिळविल्यानंतर नवनिर्वाचित आमदार गोकुळ गिते यांनी मंगळवार (दि. २३) अधिकृतपणे विधानपरिषदेत आमदारकीची शपथ घेतली. सभापती प्रा. राम शिंदे यांनी गिते यांना विधानपरिषदेच्या सभागृहात आमदारकीची शपथ दिली.
गोकुळ गिते हे आज (23 जून) कुटुंबासह विधानभवनात दाखल झाले होते. त्यांच्यासोबत मातोश्री सुनिता गिते, पत्नी उज्वला, बंधू गणेश गिते, भाजपच्या नगरसेविका दीपाली गिते, कार्यकर्ते व मित्र-परिवार विधानभवनात उपस्थित होते.
मी गोकुळ सुनिता बबन गिते, विधानपरिषदेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करतो की, कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगील. भारताचे सार्वभौम व एकात्मता उन्नत राखीन. आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेन. अशी शपथ गितेंनी घेतली.
शपथ पूर्ण झाल्यानंतर गोकुळ गिते यांनी 'जय हिंद, जय महाराष्ट्र... जय शिवराय' असे म्हटले. तेवढ्यात कुणीतर जय गिरीश महाजन... अशी घोषणा दिली अन् सभागृहात एकच हशा पिकला. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही चान्स सोडला नाही,' अनऑफिशियल काही केलं असेल तर सांगून द्या, आता काही राहिलं नाही...' अशी मिश्किल टिपणी फडणवीसांनी केली अन् सभागृहात पुन्हा एकदा जोरदा हशा पिकला. दरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आपले अभिनंदन केल्याची माहिती माध्यमांशी बोलताना आमदार गोकुळ गिते यांनी दिली.
नाशिक विधानपरिषद निवडणुकीत मंत्री गिरीश महाजन यांची भूमिका महत्वपूर्ण होती. गोकुळ गिते यांच्या माघारीची जबाबदारी पक्षाने महाजन यांच्यावर टाकली होती. महाजन व गिते बंधूंचे कौटुंबिक संबंध आहेत. महाजन यांच्यासह महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांच्या मनधरणीनंतर गोकुळ गिते यांनी निवडणूक प्रचार थांबवत असल्याची घोषणा केली होती. मात्र, प्रत्यक्षात त्यांनी गनिमी कावा करत निवडणूक जिंकली. मात्र, गोकुळ गिते यांच्या विजयामागे महाजन यांची खेळी असल्याचा आरोप पराभूत आमदार नरेंद्र दराडे यांनी केला आहे. महाजन यांनीच गितेंना ताकद दिल्याचा आरोप दराडेंनी केला आहे.
मुंडे-गिते गळाभेट
विधानभवनात एण्ट्री केल्याबरोबर गोकुळ गिते यांची पहिली भेट राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांच्यासोबत भेट झाली. दोघांनीही एकमेकांची गळाभेट घेतली अन् फोटोही काढला. या भेटीची यावेळी चांगली चर्चा रंगली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.