Nashik MLC Election : "तू नाराज होऊ नको..." गोकुळ गितेंचा शिवसेना प्रवेश अन् एकनाथ शिंदेंचा दराडेंना फोन, इनसाईड स्टोरी आली समोर

Gokul Gite’s Shiv Sena Entry : अपक्ष गोकुळ गिते यांनी काल निवडून आल्याबरोबर दुपारुन एकनाथ शिंदेकडे धाव घेतली. मुंबईत शिंदेच्या दरबारात हजेरी लावत त्यांनी शिवसेनेचे सहयोगी सदस्यत्व स्विकारले. अत्यंत वेगाने या घडामोडी घडल्या.

Eknath Shinde, Narendra Darade
Eknath Shinde, Narendra DaradeSarkarnama
Published on
Updated on

Nashik MLC Election : अपक्ष गोकुळ गिते यांनी विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवला. अपक्ष गोकुळ गिते यांनी महायुतीचे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांना मोठ्या मतांच्या फरकाने पराभूत केलं. महायुतीची मते फोडण्यात ते यशस्वी झाले, त्यांना महायुतीमधूनच रसद मिळाल्याने त्यांचा विजय सुकर झाला. या निकालानंतर काही तासांत ते विशेष विमानाने मुंबईला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी त्यांच्या दरबारात दाखल झाले.

मुंबईत पत्रकारपरिषद घेत त्यांनी आपण शिवसेना सहयोगी सदस्य म्हणून काम करत असल्याचे जाहीर केले. अतिशय वेगाने या घडामोडी घडल्या. स्वत: उदय सामंत विशेष विमान घेऊन त्यांना न्यायाला आल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. गोकुळ गिते यांच्या शिवसेना प्रवेशाची इनसाईड स्टोरी आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत फोनवर झालेल्या संभाषणाचा मोठा खुलासा पराभूत उमेदवार नरेंद्र दराडे यांनी केला आहे.

विधान परिषदेच्या नाशिक मतदारसंघातील जागा महायुतीत झालेल्या दगाफटक्यामुळे शिंदे गटाला गमवावी लागली. या स्थितीत निवडून आलेल्या गिते यांनाच शिंदेंनी आपल्या ताफ्यात सामील करुन घेतलं. त्यामुळे साहजिकच पराभूत उमेदवार नरेंद्र दराडे यांना हे सगळं प्री प्लॅनिंग असल्याचं वाटू शकेल अशाही चर्चा सुरु झाल्या. मात्र, प्रत्यक्षात गोकुळ गिते शिवसेनेचे सहयोगी सदस्य होत आहेत हे दराडेंना ठावूक होतं.


Eknath Shinde, Narendra Darade
Gokul Gite Nashik MLC : दराडेंची पाट लावताच गोकुळ गितेंचा दुसरा डाव, मंत्री महाजनांसह बंधू गणेश गितेंना केलं 'सेफ'

गोकुळ गिते यांच्या शिवसेना प्रवेशापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मला फोन आला होता असा खुलासा माध्यमांशी बोलताना दराडेंनी केला आहे. त्यांनी सांगितलं नरेंद्र काही हरकत नाही चांगली लढाई केली. काही लोकांमुळे आपल्याला अपयश आलं. गोकुळ गिते यांना मी पक्षात सहयोगी सदस्य म्हणून घेत आहे. तू काही नाराज होऊ नको असं त्यांनी मला सांगितलं.


Eknath Shinde, Narendra Darade
Nashik MLC Election : अभूतपूर्व ! नाशिक विधानपरिषदेच्या निवडणुकीत महायुतीची तब्बल 218 मते फुटली; सर्वाधिक भाजपची?

मी पराभूत झालो असलो तरी आगामी काळात पक्ष वाढवायचा आहे. विधानपरिषदेच्या केवळ चारच जागा शिवसेनेने लढवल्या. त्यातही एक आमदार पराभूत झाला. पक्षाचा एक आमदार कमी होऊ नये या हेतूने मी स्वत: या प्रवेशाला होकार दिल्याचं दराडेंनी सांगितलं. गोकुळ गितेंच्या पक्ष प्रवेशाआधी एकनाथ शिंदे यांच्याकडून मला विचारणा झाल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच आम्ही तुमच्या पाठिशी राहू असा शब्द शिंदेंनी दिल्याचा दावा दराडेंनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com