Gold Silver Jewellery Duty Drawback : सोन्या-चांदीच्या दागिन्यांच्या निर्यातदारांना झटका; ड्युटी ड्रॉबॅक दरात कपात

Government cuts duty drawback rates on gold and silver jewellery exports, reducing refunds for exporters : सोन्याच्या दागिन्यांवरील परतावा 3.1%, तर चांदीच्या दागिन्यांवरील परतावा सुमारे 9% घटला; केंद्र सरकारच्या नव्या दरांचा निर्यातदारांवर काय परिणाम होणार?
Gold Silver Jewellery Duty Drawback
Gold Silver Jewellery Duty DrawbackSarkarnama
Published on: 
Updated on: 

Gold Jewellery Export : सोनं आणि चांदीच्या दागिन्यांचा व्यापार करणाऱ्या व्यावसायिक आणि निर्यातदारांसाठी एक महत्त्वाची व चिंतेची बातमी समोर आली आहे.

केंद्र सरकारने सोन्या-चांदीच्या दागिन्यांच्या निर्यातीवर मिळणाऱ्या 'ड्युटी ड्रॉबॅक' दरांमध्ये मोठी कपात केली आहे. अर्थ मंत्रालयाने यासंदर्भातील नवीन परिपत्रक जारी केले असून, या निर्णयामुळे निर्यातदारांना मिळणाऱ्या शुल्काच्या परताव्यामध्ये थेट कपात झाली आहे.

विशेष म्हणजे, अवघ्या काही महिन्यांपूर्वी जुलै महिन्यात निर्यातदारांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने हेच दर वाढवले होते. मात्र, आता जागतिक आर्थिक स्थिती आणि बाजारातील बदलत्या परिस्थितीचा हवाला देत सरकारने (Government) हे दर पुन्हा कमी केले आहेत.

अर्थ मंत्रालयाने जाहीर केलेल्या नवीन दरानुसार, सोने (Gold Rate) आणि चांदीच्या दागिन्यांवरील परताव्याला फटका बसला आहे. सोन्याच्या दागिन्यांवरील ड्युटी ड्रॉबॅक दर आता प्रति ग्रॅम 1,851.99 रुपयांवरून घसरून 1,794.11 रुपये करण्यात आला आहे. यामध्ये सुमारे 3.1% ची कपात झाली आहे. चांदीच्या दागिन्यांवर आणि विशिष्ट चांदीच्या वस्तूंवरील दरांमध्ये सर्वात मोठी कपात पाहायला मिळत आहे. हे दर प्रति किलो 29,501.09 रुपयांवरून थेट 26,859.02 रुपयांवरवर आणण्यात आले आहेत. यामध्ये जवळपास 9% ची मोठी घट झाली आहे.

Gold Silver Jewellery Duty Drawback
Farmer sends rs51 money order : दुष्काळी मदत 5 हजारांची; शेतकऱ्याने मुख्यमंत्र्यांना पाठवले 51 रुपये! अहिल्यानगरमध्ये नेमकं काय घडलं?

जेव्हा भारतीय व्यापारी देशातून परदेशात सोन्या-चांदीचे दागिने किंवा वस्तूंची निर्यात करतात, तेव्हा उत्पादन शुल्कावर आणि करांवर सरकारकडून काही प्रमाणात कर परतावा म्हणजे रिफंड दिला जातो. यालाच 'ड्युटी ड्रॉबॅक' म्हटले जाते.

Gold Silver Jewellery Duty Drawback
Sanjay Raut Supreme Court : ‘दहा वेळा माफी मागेन, पण…’; संजय राऊत यांचा सर्वोच्च न्यायालयाला संदेश

जागतिक परिस्थितीचा परिणाम

आंतरराष्ट्रीय बाजारातील बदलती समीकरणे, कच्च्या मालाच्या किमतीतील सातत्यपूर्ण उतार-चढ आणि देशांतर्गत व जागतिक बाजारपेठेतील बदल लक्षात घेऊन सरकारने हे पाऊल उचलले आहे. जुलै महिन्यात निर्यातदारांची स्पर्धात्मक क्षमता वाढवण्यासाठी हे दर वाढवण्यात आले होते. परंतु ताज्या जागतिक आर्थिक परिस्थितीनुसार त्यात पुन्हा एकदा कपात करण्यात आली आहे.

नफ्यांवर परिणाम होणार

या कपातीमुळे भारतीय दागिन्यांच्या निर्यातीवर आणि सराफ बाजारातील उलाढालीवर दूरगामी परिणाम होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. निर्यातीवर मिळणारा आर्थिक परतावा कमी झाल्यामुळे दागिन्यांची निर्यात करणाऱ्या कंपन्या आणि व्यापाऱ्यांचा खर्च वाढणार आहे. याचा थेट परिणाम त्यांच्या नफ्यावर होऊ शकतो.

सोन्या-चांदीच्या व्यवहारांवर संमिश्र परिणाम

ड्युटी ड्रॉबॅक कमी झाल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात भारतीय दागिन्यांच्या किमतींवर थोडाफार परिणाम होऊ शकतो, ज्यामुळे जागतिक स्पर्धेत टिकून राहण्यासाठी भारतीय निर्यातदारांना अधिक प्रयत्न करावे लागतील, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. हा नियम प्रामुख्याने निर्यातीशी संबंधित असला, तरी निर्यातीवर येणाऱ्या दबावामुळे देशांतर्गत सराफ बाजारात आणि सोन्या-चांदीच्या व्यवहारांवर संमिश्र परिणाम पाहायला मिळू शकतात.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com