Nashik News : पालकमंत्री दादा भुसेंनी ऐकली वारकऱ्यांची हाक ; पालखी सोहळ्याला ३० लाखांचा निधी मंजूर

Ashadhi Ekadashi 2023 News : या पालखी सोहळ्यात ४२ दिंड्यांसमवेत हजारो वारकरी सहभागी होणार...
Nashik News
Nashik News Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Nashik : त्र्यंबकेश्वर येथील संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांची पालखी पंढरपूरकडे उद्या (दि.२ जून) प्रस्थान करणार आहे. या पालखी सोहळ्यात ४२ दिंड्यांसमवेत हजारो वारकरी सहभागी होणार आहेत. पालखी सोहळ्यातील वारकरी सुमारे २५ दिवस पायी प्रवास करून वारकरी आषाढी एकादशीसाठी पंढरपूरात पोहोचणार आहेत. याच पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी वारकऱ्यांची हाक ऐकली असून महत्वाचा निर्णय घेतला आहे.

संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्यासाठी जिल्हा नियोजन समितीनं ३० लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना पाण्याच्या टँकर्ससह मोबाइल टॉयलेट्स उपलब्ध होणार आहे. पालखी सोहळ्यासाठी प्रत्येकी १० सीटचे १२ मोबाईल टॉयलेट्स पंढरपूर(Pandharpur)पर्यंत पुरवण्यात येणार आहेत याबाबतची माहिती जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी दिली आहे.

Nashik News
Akole Nilwande Dam : सरकार बदललं अन् नशिबाने 'त्यांना' कालव्यांच्या चाचणीची संधी मिळाली; थोरातांंचा शिंदे-फडणवीसांना चिमटा..

इतिहासात पहिल्यांदाच 'हा' निर्णय....

संत श्री निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखीचे श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर(Trimbakeshwar) येथून २ जून रोजी दुपारी २ वाजता पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. तसेच संत निवृत्तीनाथ महाराजांच्या जयंतीचे हे सातशे पन्नासावे वर्ष असल्याची माहिती निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थानच्या वतीने देण्यात आली आहे. यंदाच्या वर्षी एक दिवस अगोदर होणार आहे.

तसेच प्रथमच त्र्यंबकेश्वर येथेच प्रयागतीर्थाजवळील महानिर्वाणी आखाड्यात सद्गुरू श्रीगहिनीनाथ महाराजांच्या समाधी स्थानी गुरुघरी निवृत्तीनाथ महाराज पालखी पहिला मुक्काम करणार आहे. पालखी एक दिवस अगोदर मार्गस्थ करण्याचा निर्णय निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थांच्या इतिहासातील पहिलाच निर्णय आहे.

Nashik News
Bharatshet Gogawale Birthday: ओ भरतशेठ, तुम्ही नादच करताय थेट, तुमचा ‘बर्थ डे' लईच बेस्ट ; पण जी- 20 ची तयारी होतेय वेस्ट !

४२ दिंड्यांसमवेत हजारो वारकरी...

या पालखी सोहळ्यात ४२ दिंड्यांसमवेत हजारो वारकरी सहभागी होणार आहेत. पालखी सोहळ्यातील वारकरी सुमारे २५ दिवस पायी प्रवास करून वारकरी २८ जून रोजी पंढरपूरात पोहचणार आहेत. या पालखी सोहळ्यासाठी नाशिक जिल्हा परिषदेकडून दरवर्षी आरोग्य पथक व पाण्याचा टँकर पुरवला जातो. त्यासाठी जिल्हा परिषद २ सेस निधीतून चार लाख रुपयांची तरतूद केली जाते. (Latest Marathi News)

यंदा प्रथमच ३० लाख रुपयांचा निधी

मात्र, एवढया मोठ्या दिंडी सोहळ्यात ही सुविधा अपुरी पडत आहे. यामुळे वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये याकरिता संत निवृत्तीनाथ महाराज समाधी मंदिर देवस्थानच्या विश्वस्तांनी जिल्हाधिकारी कार्यालयास निर्मलवारीसाठी फिरते टॉयलेट व पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुविधा पुरवण्याचीमागणी केली होती. त्या मागणीला प्रतिसाद देत पालखी सोहळ्यासाठी पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारे पाच टँकर्स पंढरपूरपर्यंत पुरवण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे.

याशिवाय १२ फिरते टॉयलेट्सदेखील पुरवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे संत निवृत्तीनाथ पालखी सोहळा आता निर्मलवारी होणार आहे. यासाठी यंदा प्रथमच ३० लाख रुपयांचा निधी जिल्हा नियोजन समितीमधून उपलब्ध करून दिला.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.