Gujarat Water Issue: आदिवासी आक्रमक! गुजरातला जाणारे पाणी रोखणार? सुरगाण्यात ‘जल, जमीन, जंगल’ संघर्ष सुरू

Tribal Water Movement: गुजरातला जाणारे पाणी वळविण्याच्या निविदांवरून सुरगाण्यातील आदिवासी आक्रमक झाले आहेत. त्यांनी जल, जमीन, जंगल हक्कांसाठी आंदोलनाचा इशार दिला आहे.
Tribal Water Movement
Tribal Water Movement Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Gujarat Water issue: गुजरातला जाणारे पाणी वळविणे हा प्रश्न केले काही दिवस चर्चेत आहे. यावरून दुष्काळाचे राजकारण रंगले आहे. आता याबाबत आदिवासींनी इशारा दिल्याने हा प्रश्न पेटण्याची चिन्हे आहेत.

नार-पार सह अन्य नाशिक जिल्ह्यातील आदिवासी भागातील पश्चिम वाहिन्या नद्यांचे महाराष्ट्रातील पाणी गुजरातला वाहून जाते. हे पाणी अडविणे हा राजकारण आणि पाटबंधारे दोन्ही दृष्टीने आव्हान ठरला आहे. या संदर्भात राज्य शासनाने निविदा काढली आहे. यामुळे आगीत तेल पडले आहे.

पश्चिम वाहिन्यांचे पाणी उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वळविण्यासाठी सरकारने सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात नुकत्याच निविदा काढण्यात आल्या. मात्र या संदर्भात स्थानिक आदिवासी नागरिकांना कोणतीही माहिती दिलेली नाही.

पेसा कायद्याअंतर्गत आदिवासींच्या हक्कांचे उल्लंघन करणारा हा निर्णय आहे. यापूर्वीच्या पुनद धरणाचे भूसंपादन झाल्यावर आदिवासींचे कोणतेही पुनर्वसन झालेले नाही. आधीचे पुनर्वसन झाले नसताना दुसऱ्या धरणातून आदिवासी विस्थापित होणार आहेत. त्यामुळे या भागात संतापाची लाट उसळली आहे.

Tribal Water Movement
Mission Mahagram: गावांच्या विकासाला 10 लाखांचा ‘बूस्टर’; कोणत्या गावांना मिळणार निधी? जाणून घ्या निकष

दोन दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली होती. मराठवाड्याचा दुष्काळ हटवणार असे आश्वासन दिले. त्यानंतर निविदा निघाल्या मात्र त्यावरून आदिवासी आंदोलन पेटले आहे.

सरकारने यासंदर्भात विश्वासात न घेता काढलेल्या निविदा तातडीने रद्द कराव्यात. पुनर्वसनाचा प्रश्न कसा सोडवणार हे आधी जाहीर करावे. जल, जंगल, जमीन उध्वस्त करण्याचे हे धोरण शेतकऱ्यांना व आदिवासींना विश्वासात न घेता राबविल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला.

Tribal Water Movement
Teacher Recruitment: शिक्षक भरती आता कॅमेऱ्याच्या नजरेत; मुलाखतींचे होणार रेकॉर्डिंग?

​बाधित शेतकऱ्यांच्या पुनर्वसनाचा आणि हक्कांचा प्रश्न आधी मार्गी लावावा, अन्यथा हे आंदोलन अधिक तीव्र केले जाईल. जमिनीचा एक इंच ताबाही शासनाला घेऊ दिला जाणार नाही, असा एकमुखी निर्धार या बैठकीत व्यक्त करण्यात आला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com