MLC Election : गुवाहाटीची आठवण करून देत गुलाबराव पाटलांचा भाजपवर थेट हल्ला, महायुतीतील राजकारण तापले! शिंदेंच्या शिवसेनेचा संयम सुटतोय?

Gulabrao Patil News: विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे जागावाटप झाले. यामध्ये भाजपने सर्वाधिक अकरा जागा घेतल्या. यावरून सहकारी पक्षांमधील नाराजी आणि खदखद आता व्यक्त होऊ लागली आहे.
Gulabrao Patil
Gulabrao Patil Sarkarnama
Published on
Updated on

Gulabrao Patil Politics : राज्यात 17 जागांसाठी विधानपरिषद निवडणूक होत आहे. यामध्ये सर्वाधिक 11 जागा भाजपला मिळाले आहेत. शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाला अवघ्या चार जागा मिळाल्या. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाला दोन जागांवर समाधान मानावे लागले.

शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाच्या विद्यमान पाच जागा होत्या. प्रत्यक्षात त्यांना अवघ्या चार जागा मिळाल्या आहेत. या चार जागांवर देखील महायुतीच्या आणि विशेषता भाजपच्या इच्छुकांनी बंडखोरी केली आहे. हा सध्या वादाचा विषय आहे.

पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांना जळगाव मतदारसंघ हवा होता. त्यासाठी त्यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली. मुलासाठी निवडणुकीची तयारी केलेल्या गुलाबराव पाटील यांची ऐनवेळी जागा भाजपने आपल्याकडे घेतल्याने निराशा झाली.

या संदर्भात बंडखोरी हा संवेदनशील विषय असल्याचे गुलाबराव पाटील यांनी म्हटले आहे. शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाच्या पाच जागा हक्काच्या होत्या. मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चार जागांवर समाधान मानले आहे. चार जागांवरही जर बंडखोरी होत असेल तर ते योग्य नाही, अशा स्पष्ट शब्दात त्यांनी सहकारी भाजपाला इशारा दिला आहे.

Gulabrao Patil
Nashik MLC Election : गोकुळ गितेंनी शड्डू ठोकल्यानं नाशिक विधानपरिषदेचं गणित बदललं; निवडणुकीतून माघार घेणाऱ्या मविआचे महत्व वाढले

संदर्भात गुलाबराव पाटील यांनी शिवसेनेचे आमदारांनी केलेल्या उठावाची आठवण करून दिली. शिवसेनेच्या आमदारांनी गुवाहाटीला जाऊन बंड केले नसते तर काय झाले असते? याची आठवण त्यांनी महायुतीला करून दिली आहे. शिवसेनेच्या जागांवर बंडखोरी होणे हे भविष्यात महायुतीसाठी चांगली लक्षणे नाही या सूचक शब्दात त्यांनी आपली चिंता व्यक्त केली आहे. हे चुकीचे प्रकार तातडीने थांबले पाहिजे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

प्रारंभी माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी भाजपवर निशाणा साधला होता. त्यांनी दोन्ही शिवसेना एकत्र येण्याबाबत विधान केले होते. त्याला काही शिवसेना नेत्यांनी सूचक वक्तव्य करून समर्थन दिले होते. आता मंत्री गुलाबराव पाटील यांनीही तसाच सूर आळवल्याने तो चर्चेचा विषय ठरला आहे. यानिमित्ताने पुन्हा एकदा महायुतीतील खदखद बाहेर पडली.

Gulabrao Patil
Farm Loan Waiver : दर निवडणुकीत कर्जमाफीचं गाजर देण्याऐवजी एकदाच कंडका पाडा... 10 कायमस्वरुपीच्या उपाययोजनांच धाडस सरकार दाखवणार का?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com