जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील कोरोनाबाधित

शिवसेनेचे गुलाबराव पाटील यांना कोरोनाची लागण झाली.
Shivsena leader Gulabrao Patil
Shivsena leader Gulabrao PatilSarkarnama
Published on: 
Updated on: 

जळगाव : जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gualabrao Patil) यांना कोरोना (Covid19) संसर्गाची लागण झाली आहे. शुक्रवारी दुपारी त्यांना त्रास होत असल्याने त्यांनी कोरोना चाचणी केली.

Shivsena leader Gulabrao Patil
गिरीश महाजनांच्या सहकाऱ्यालाही अटकेपासून संरक्षण!

चाचणीनंतर त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. यापूर्वी उत्तर महाराष्ट्रातील विविध नेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॅा भारती पवार यांसह खासदार हेमंत गोडसे तसेच विविध आमदारांनाही कोरोना संसर्ग झाला. त्यामुळे सध्या त्याचा नेत्यांच्या व शासकीय कार्यक्रमांवर परिणाम होत आहे.

Shivsena leader Gulabrao Patil
शिवसेना, भाजपच्या वादात छगन भुजबळ काढणार तोडगा!

यासंदर्भात पालकमंत्री पाटील यांनी , माझ्या संपर्कात आलेल्यांनी पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिकांनी कोरोना चाचणी करून घ्यावी. माझी प्रकृती ठणठणीत आहे, असे पालकमंत्री पाटील यांनी सांगितले. गुरुवारी पालकमंत्र्यांनी जिल्हा नियोजन समितीची बैठक घेतली होती. सोबतच काही कार्यक्रमांना हजेरी लावली होती, असे सांगितले.

----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com