

Jalgaon Politics : 15 जानेवारीला राज्यातील महापालिकांच्या निवडणुकांसाठी मतदान होणार असून माघारीनंतर आता सर्वपक्षीयांचे चित्र स्पष्ट झाले. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली असून प्रचाराला लागले आहेत. अशातच शिवसेना शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगावच्या धरणगाव येथील प्रचार सभेत तुफान फटकेबाजी केल्याचे पाहायला मिळाले.
गुलाबराव पाटलांनी या सभेत शिवसेना आमदार किशोर पाटील यांना एक सल्ला दिला. म्हणाले, विरोधकांना काहीही बोलू नका.आपण निवडून आलो आहोत, म्हणजे आता आपण सर्वांचे आहोत. लोकशाहित निवडणूक संपली की विरोध संपला पाहीजे असं त्यांनी किशोर पाटलांना सांगितलं.
गुलाबराव पुढे म्हणाले, विरोधक जरी आपल्याकडे आले, तरी त्यांना पाणी पाजा. गुलाबराव पाटील सरकारमध्ये मंत्री असल्याने बोलताना येणाऱ्या मर्यादांवर भाष्य करताना ते म्हणाले, मी सत्तेत सरकारमध्ये मंत्री आहे. त्यामुळे मला शब्द जपून वापरावे लागतात. मला सर्वांसोबत 'आय लव्ह यू' करावं लागतं. जबाबदारी सांभाळून बोलावं लागतं असं ते म्हणाले.
पण किशोर पाटील यांना बोलण्याची सूट असल्याने 'ते दंड थोपटत आहेत' असेही त्यांनी मिश्किल भाषेत सांगितले. किशोर पाटील यांच्या राजकीय जीवनावर भाष्य करताना गुलाबराव पाटील म्हणाले, किशोर पाटील पूर्वी पोलिसात होते. कधीकाळी ते आमदाराच्या मागे पिस्तूल घेऊन उभे राहिले असते, पण नशिबाने तेही आमदार झाले.
दरम्यान धरणगाव नगरपालिकेच्या राजकारणाचा संदर्भ देताना गुलाबराव पाटील म्हणाले, धरणगावची सत्ता माझ्याकडे 25 वर्षे होती, ती आता गेली आहे. पण ती परत येणार नाही असे नाही. ती सत्ता पुन्हा माझ्याकडे येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. निवडून आल्यानंतर काही नगरसेवकांचे वर्तन कसे बदलते, निवडून आल्यानंतर दोन मोबाईल, चार माणसं आणि हवा लागते या भाषेत त्यांनी नगरसेवकांचे कान टोचले.
यावेळी गुलाबराव पाटलांनी भावी नगरसेवकांना आवाहन केलंं. म्हणाले, हात जोडून सांगतो, आलेल्याशी गोड बोला. काम होवो अथवा न होवो, पण भाषा गोड ठेवा. काही नगरसेवक निवडून दिलेल्यालाच नंतर पाहत नाहीत.जे डोक्यावर घेतात, त्यांनाच नंतर डोक्याखाली पटकतात या भाषेत त्यांनी भावी नगसेवकांना मोलाचा सल्ला दिला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.