गुलाबराव 'सरकारनामा'शी बोलले : मी गुवाहटीला चाललो... हितं काय करू?

एकनाथ शिंदे Eknath Shinde यांच्यासह शिवसेनेचे (Shivsena) आमदार गुवाहटीमध्ये आहेत.
Gulabrao Patil
Gulabrao PatilSarkarnama
Published on
Updated on

जळगाव : माझ्या रक्तात शिवसेना (Shivsena) आहे, आम्ही शिवसेना म्हणूनच राहणार आहोत. पक्ष बदलणार नाही मी गुवाहटीला चाललो आहे. राज्यातील बहुतेक मंत्री नेते गेले तसेच जिल्यातील तीन जणही गेले मी एकटा काय करू? असे स्पष्ट मत शिवसेनेचे फायरब्रँड नेते व राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी 'सरकारनामा'शी बोलतांना व्यक्त केले.

शिवसेना वाढविण्यासाठी संघर्ष करणारे तसेच टपरीधारकापासून तर थेट मंत्रीपदापर्यंत पोहोचलेले गुलाबराव पाटील यांची ओळख आहे. आपल्या भाषणशैलीने ते सर्वांना मंत्रमुग्ध करतात, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे सुध्दा त्यांच्या भाषणाचे कौतुक करीत असत. जळगाव जिल्ह्यात शिवसेना वाढविण्यात त्यांनी मोठे कष्ट घेतले आहे. जिल्ह्यात त्यांनी अनेक आंदोलने आणि मोर्चे काढले आहेत. एक कट्टर शिवसैनिक म्हणून त्यांची राज्यभरात ओळख आहे.

Gulabrao Patil
लाॅकडाऊन उठवण्यासाठी आमदार नरेंद्र भोंडेकर झाले आक्रमक

राज्यात सद्या शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड केले आहे. त्यांच्यासोबत शिवसेनेचे अनेक मंत्री तसेच आमदारासह ४० जण असल्याचे सांगण्यात येत आहे. सद्या ते सर्व आसाम राज्यातील गुवहाटी येथे आहेत. जळगाव जिल्ह्यातील शिवसेनेचे चार पैकी तीन आमदार अगोदरच गुवहाटी येथे गेले आहेत. मंत्री गुलाबराव पाटीलही नॉट रिचेबल होते. त्यामुळे त्यांच्याबाबतीतही चर्चा सुरू होती.

Gulabrao Patil
ठाकरेंवर वार करणाऱ्या पत्रावर शंभूराज देसाईंची पहिली सही!

याबाबत त्यांच्याशी थेट फोनवरुन चर्चा केली असता 'सरकारनामा'शी बोलताना ते म्हणाले, होय मी गुवहाटीला चाललो आहे, जिल्ह्यातील तीन जण गेले आहेत. तसेच अनेक जण गेले आहेत. मी एकटा राहून काय करू? शिवसेनेच्या परिस्थितीबाबत बोलतांना ते म्हणाले, कि अत्यंत वाईट परिस्थिती आहे, सर्वच फाटल आहे. त्यामुळे आता ते साधंणही कठीण आहे. वातावरण पाहून पक्षाच्या प्रमुखांनी निर्णय घ्यायला हवा होता. परंतु आता त्याचीही वेळ निघून गेली आहे. होय पण आपण पक्ष बदलणार नाही, आम्ही शिवसेना म्हणूनच राहणार आहोत. शिवसैनिक म्हणूनच कार्य करणार आहोत. कारण शिवसेना, आपल्या रक्तात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com