Jalgaon News: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस-पवार सरकारवर जोरदार निशाणा साधत माझ्या नादी लागू नका नाही तर तुमचे सर्वांचे कपडे फाडेल, असा थेट इशारा दिला होता. राऊतांच्या या इशाऱ्याला मंत्री गुलाबराव पाटलांनी जोरदार प्रत्युत्तर देत ज्यांचे स्वत:चे कपडे ठिकाणावर नाही, त्यानी ते सांभाळावेत, असा जोरदार टोला संजय राऊतांना लगावला.
"संजय राऊतांनी आपले स्वत:चे कपडे सांभाळावेत. कारण त्यांचेच कपडे आज ठिकाणावर दिसत नाहीत. त्यामुळे राज्य सरकारच्या कपड्याकडे त्यांनी लक्ष देवू नये", असा खोचक सल्लाही गुलाबराव पाटलांनी राऊतांना दिला.
जळगावमध्ये स्वातंत्र्य सैनिक व त्यांच्या नातेवाईकांचा सत्कार मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते पार पडला. यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी संजय राऊतांवर टीका केली.
राज्यात कमी पडलेल्या पावसामुळे पिण्याच्या पाण्याचे नियोजन कसे असणार, या प्रश्नावर बोलताना गुलाबराव पाटलांनी सांगितले की, सर्व महापालिका आणि जिल्हा परिषदांना सूचना देण्यात आलेल्या आहेत.
ज्या ठिकाणी दररोज पाणी देण्यात येते त्या ठिकाणी आता एक दिवसाआड करा. ज्या ठिकाणी एक दिवसाआड पाणी देण्यात येते, त्या ठिकाणी आता दोन दिवसाआड पाणी पुरवठा करावा, ज्या ठिकाणी टँकरची आवश्यकता आहे, त्या ठिकाणी टँकरने पाणी पुरवठा करावा, असे आदेश देण्यात आले असल्याची माहिती गुलाबराव पाटलांनी दिली.
Edited By : Ganesh Thombare
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.