Nandurbar Election 2024: निवडणूक हिना गावितांची, भवितव्य विजयकुमार गावितांचे

Heena Gavit And Vijaykumar Gavit Politics : लोकसभेत पराभव झाल्यास विजयकुमार गावित यांच्या राजकीय घोडदौडीला बसू शकतो लगाम.
Heena Gavit And Vijaykumar Gavit Politics
Heena Gavit And Vijaykumar Gavit Politics Sarkarnama
Published on
Updated on

Hina Gavit Result Analysis : नंदुरबार मतदारसंघाचा निकाल उद्या आहे. या निकालातून मंत्री विजयकुमार गावित यांच्या राजकीय वाटचालीचे भवितव्य ठरेल. त्यामुळे ही निवडणूक नंदुरबार जिल्ह्याचे राजकारण बदलणारी ठरू शकते.

नंदुरबार मतदारसंघात भाजपच्या हिना गावित हॅटट्रिकसाठी प्रयत्नशील आहेत. त्यांना काँग्रेसचे गोवाल पाडवी यांनी आव्हान दिले आहे. या निवडणुकीत गावित यांचे विरोधक संघटितरित्या पडद्यामागून काँग्रेसला रसद पूर्वत आहेत. त्यामुळे या निवडणुकीत हिना गावित यांचा पराभव झाल्यास मंत्री विजयकुमार गावित यांची मोठी राजकीय पीछेहाट होऊ शकते.

नंदुरबार मतदारसंघात गेल्या निवडणुकीत हिना गावित 95 हजार मताधिक्क्याने विजयी झाल्या होत्या. यंदा त्यांच्या विरोधात काँग्रेसने नियोजन पूर्वक आखणी केली आहे. यामध्ये भारतीय जनता पक्षातील गावित यांच्या विरोधक देखील काँग्रेसला छुपी मदत करीत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांच्या सभा येथे झाल्या. दोन्ही पक्षांनी या निवडणुकीत मोठी ताकद पणाला लावली आहे.

Heena Gavit And Vijaykumar Gavit Politics
Radhakrishna Vikhe On Mallikarjun Kharge: मंत्री विखेंनी उडवली मल्लिकार्जुन खर्गेंची खिल्ली; म्हणाले,'मुंगेरीलाल के हसीन सपने देख रहे है'!

नंदुरबार जिल्ह्याच्या राजकारणात हिना गावित यांनी भारतीय जनता पक्षाने उमेदवारी घेतली आहे. मात्र या जिल्ह्यात विजयकुमार गावित हेच एक पक्ष आहे. ते स्वतः मंत्री आहेत. त्यांची एक कन्या हिना ही खासदार तर दुसरी कन्या सुप्रिया ही जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आहे.

Heena Gavit And Vijaykumar Gavit Politics
Radhakrishna Vikhe On Balasaheb Thorat : पुत्राची खासदारकी धोक्यात; मंत्री विखे संतापून म्हणाले, 'बाळासाहेब थोरातांना शरम वाटली पाहिजे'

गावित यांचा या निवडणुकीत पराभव झाल्यास त्यांचे विरोधक प्रबळ होतील. जिल्ह्याच्या राजकारणातील भारतीय जनता पक्षाच्या सत्तेला ओहोटी लागू शकते. नंदुरबार शहरातून विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना शिंदे (Shivsena) गटाचे नेते चंद्रकांत रघुवंशी विजयकुमार गावित यांना आव्हान निर्माण करतील. यानिमित्ताने गावित यांच्या विरोधकांना बळ मिळेल त्यामूळे निवडणूक हिना गावित यांची असली तरीही, विजयकुमार गावित यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com