मी मरेपर्यंत एकनाथ शिंदे यांचाच राहीन!

सुहास कांदे यांनी बंडखोरीच्या समर्थनासाठी पुढे केली नांदगावच्या विकासासाठी ढाल.
Suhas Kande News, Eknath Shinde News, Nashik News
Suhas Kande News, Eknath Shinde News, Nashik NewsSarkarnama
Published on
Updated on

नांदगाव : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) वगळता आपण कोणत्याही नेत्याच्या किंवा पक्ष पदाधिकाऱ्यांच्या संपर्कात नाही. याबाबत गैरसमज पसरवले जात आहेत. मी मरेपर्यंत एकनाथ शिंदे यांचाच समर्थक राहीन. जनतेने आणि सर्व शिवसैनिकांनी (Shivsena) अफवांना बळी पडू नये, असा व्हिडिओ मंगळवारी आमदार सुहास कांदे (Suhas Kande) यांनी समाजमाध्यमांवर प्रसारित केला. (Shivsena`s rebel MLA Suhas kande upload video on social media)

Suhas Kande News, Eknath Shinde News, Nashik News
शिवसेनेचे बंडखोर सरकार पाडणार अन् अमरिशभाई, रावल मंत्री होणार!

एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या ट्विटर हँडल व इंस्टाग्राम अकाउंटवरून आमदार सुहास कांदे यांचा व्हिडिओ प्रसारित केला आहे. नंतर नांदगावसह जिल्ह्यातील विविध ग्रुपवर तो व्हायरल झाला.(Eknath Shinde News)

Suhas Kande News, Eknath Shinde News, Nashik News
बंडखोरांना चर्चेचा प्रस्ताव देण्याची पद्धत नसलेली शिवसेना मवाळ कशी झाली?

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचा विचार प्रामाणिकपणे पुढे नेणारे एकनाथ शिंदे यांच्यासोबत आपण स्वखुशीने गुवाहाटी येथे आलो आहोत. नांदगाव मतदारसंघातील मनमाडसाठी करंजवण योजना, गिरणा धरणावरील नांदगाव व ७८ गावे यासह विविध विकासकामे मार्गी लागल्या पाहिजेत, यासाठी मी हा निर्णय घेतला आहे, असे स्पष्टीकरण आमदार कांदे यांनी या व्हिडिओतून दिले आहे.

दरम्यान, आमदार कांदे गुवाहाटीत असले, तरी त्यांचे कुटुंब मात्र नाशिक येथील निवासस्थानी आहे.

---

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com