Kalaram Temple : भाजपच्या कदमांकडे दुर्लक्ष तर ठाकरेंचे स्वागत ; काय म्हणाले काळाराम मंदिराचे पुरोहित...

Opponents attention to the tour : दौऱ्याकडे विरोधकांचे लक्ष
Uddhav Thackeray, Ram Kadam
Uddhav Thackeray, Ram KadamSarkarnama
Published on
Updated on

Kalaram Temple : भाजपचे आमदार राम कदम यांनी ठाकरे गट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काळाराम मंदिराला भेट देण्याला विरोध केला होता. मात्र त्यांच्या या विरोधाकडे मंदिराच्या पुरोहितांनी साफ दुर्लक्ष करीत उद्धव ठाकरे यांचे जोरदार स्वागत करण्याचे संकेत दिले आहेत.

ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सोमवारी सायंकाळी काळाराम मंदिराला भेट देणार आहेत. यावेळी त्यांच्या उपस्थितीत श्रीरामाची पूजा होणार आहे. या पूजेला महाविकास आघाडीच्या पक्षाच्या नेत्यांचा उल्लेख करीत भाजपचे आमदार कदम यांनी जाहीर विरोध केला होता. याबाबत त्यांनी मंदिराचे सुधीरदास पुजारी यांना लिहिलेले पत्र 'एक्स'वर सार्वजनिक केले होते.

Uddhav Thackeray, Ram Kadam
Uddhav Thackeray : 'उद्धव ठाकरे आले तर काळाराम मंदिर गोमुत्राने शुद्ध करावे लागेल'

यासंदर्भात सुधीरदास पुजारी यांनी 'सरकारनामा'ला सांगितले की, त्यांना असे कोणतेही पत्र मिळालेले नाही. या संदर्भात आमदार राम कदम यांनी काही दिवसांपूर्वी आपल्याशी संपर्क केला होता. त्यात त्यांनी हा प्रश्न उपस्थित केला. मात्र मंदिरात आल्यावर प्रत्येक भक्त श्रीरामासाठी लहान किंवा मोठा नसतो सर्व सारखेच असतात. त्यामुळे आम्ही असा भेदभाव करू शकत नाही. या विषयावरील राजकारणाशी आमचा संबंध नसल्याचे त्यांनी सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पुजारी म्हणाले, उद्धव ठाकरे सोमवारी मंदिराला भेट देण्याबाबत खासदार संजय राऊत यांनी यापूर्वीच सूचना दिली होती. ठाकरे यांनी देखील आमच्याशी संपर्क केला होता. आज याबाबत शिवसेनेच्या नेत्यांनी मंदिराला भेट देऊन पाहणी देखील केली. त्यामुळे उद्या सायंकाळी ठाकरे यांचे मंदिरात उत्साहात स्वागत होईल. त्यांनी नाशिकची ओळख असलेल्या काळाराम मंदिराला जरूर भेट द्यावी त्यांचे आम्ही उत्साहात स्वागत करू.

शिवसेनेच्यावतीने देखील उद्याच्या दौऱ्यात काळाराम मंदिर तसेच रामकुंडावर होणाऱ्या गोदावरी आरतीची जोरदार तयारी केली आहे. यावेळी नागरिक तसेच पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहतील. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यानंतर होणाऱ्या ठाकरे यांच्या दौऱ्याला किती प्रतिसाद मिळतो, याकडे ठाकरे यांच्या विरोधकांचे देखील लक्ष असणार आहे.

(Edited by Amol Sutar)

Uddhav Thackeray, Ram Kadam
Politcial News : श्रीराममूर्ती प्राणप्रतिष्ठा : परळीत निघाली शोभायात्रा; मुंडे भावंडांचा सहभाग

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com