Uddhav Thackeray : 'उद्धव ठाकरे आले तर काळाराम मंदिर गोमुत्राने शुद्ध करावे लागेल'

Ram Kadam : प्रभू राम काल्पनिक आहे असे सांगून प्रभू रामचंद्रांच्या अस्तित्वाचे पुरावे मागत असेल तर कोणीही राम भक्त ऐकून घेणार नाही
Uddhav Thakre  Ram Kadam
Uddhav Thakre Ram Kadam sarkarnama
Published on
Updated on

Nashik : भाजपने अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला राजकीय कार्यक्रम केल्याची टीका उद्धव ठाकरे यांच्याकडून करण्यात आली होती. आता, भाजपकडून उद्धव ठाकरे यांच्या काळाराम मंदिर भेटीला विरोध करण्यात येत आहे. या संदर्भात भाजप आमदार राम कदम यांनी थेट मंदिराच्या पुजाऱ्यांना पत्र लिहिले आहे. या पत्रातून कदम यांनी ठाकरे यांना मंदिरात येण्यापासून मंदिराच्या पुजाऱ्यांनी रोखावे, असे आवाहन केले आहे.

Uddhav Thakre  Ram Kadam
Devendra fadnavis : प्रभू श्रीरामांवर देवेंद्र फडणवीस यांचे गीत, अमृता फडणवीस गायिका...

ठाकरे यांना मंदिरात येण्याचा अधिकार आहे का? उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) आधी प्रभू रामचंद्रां विषयी अपशब्द बोलणाऱ्यांना खडे बोल सुनवावेत. प्रभू रामचंद्रांना काल्पनिक आहे म्हणून पुरावे मागणाऱ्यांचे कान टोचावे. असे केले तरच त्यांना मंदिरात प्रवेश द्यावा. नाहीतर त्यांच्या प्रवेशानंतर गोमुत्र शिंपडून मंदिर शुद्ध करावे लागेल, असे राम कदम (Ram Kadam)यानी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

श्रद्धा आणि आस्थेप्रमाणे मंदिरात दर्शन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. याबाबत दुमत नाही मात्र प्रभू रामचंद्रावर श्रद्धा असणारा माणूस प्रभू रामचंद्रांना कोणी मांसाहारी, मदिरापान करणारा म्हणत असेल. प्रभू राम काल्पनिक आहे असे सांगून प्रभू रामचंद्रांच्या अस्तित्वाचे पुरावे मागत असेल तर कोणीही राम भक्त ऐकून घेणार नाही त्याचे खंडन करून निषेध करेल, असा शब्दात जितेंद्र आव्हाड यांच्यावर देखील राम कदम यांनी निशाणा साधला. तसेच प्रभू रामचंद्र यांना अपशब्द बोलले जात असताना ठाकरे यांची राम भक्ती कुठे गेली होती? असा सवाल देखील कदम यांनी विचारला आहे.

शिवसेनेचे राज्यस्तरीय अधिवेशन

शिवसेनेचे राज्यस्तरीय अधिवेशन नाशिकमध्ये होत आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे काळाराम मंदिरात दर्शन घेऊन रामकुंडावर महाआरती करणार आहेत. याबाबत नाशिककर आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह आहे. या कार्यक्रमाला मोठी गर्दी उसळण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर काळाराम मंदिराच्या प्रशासनाने देखील ठाकरे यांच्या स्वागताची तयारी केली आहे.

(Edited By Roshan More)

Uddhav Thakre  Ram Kadam
Maratha Reservation :'शिवाजी महाराजांची शपथ घेऊन एकनाथ शिंदेंनी फसवले', मराठा आरक्षणासाठी...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com