Indurikar Maharaj : इंदुरीकरांच्या लेकीचा विवाह सोहळा; उपमुख्यमंत्र्यांकडून ध्वजारोहण सुरू अन् इकडं चोरांची ‘ऑपरेशन सफाई’

Ahilyanagar Local Crime Branch arrested two accused from a Shrirampur-based gang involved in jewellery theft during Indurikar Maharaj daughter wedding ceremony in Sangamner : निवृत्ती देशमुख उर्फ इंदुरीकर महाराज यांच्या कन्येचा संगमनेर इथं मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री यांच्या उपस्थितीत शाही विवाह झाला.
Indurikar Maharaj daughter wedding theft
Indurikar Maharaj daughter wedding theft Sarkarnama
Published on
Updated on

Indurikar Maharaj daughter wedding theft : साखरपुड्यापासून ते लग्नच्या शाही थाटापर्यंत, निवृत्ती देशमुख उर्फ इंदुरीकर महाराज यांच्या कन्येचा विवाह चर्चेत राहिला. संगमनेर इथं नुकताच झालेल्या विवाह सोहळ्याला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री, आमदार-खासदारांसह राजकारणातील हजारो मंडळींनी हजेरी लावली.

या विवाह सोहळ्याची राज्यात चर्चा होत असतानाच, सोहळ्यात हात की सफाई करणाऱ्या दोघा चोरांना पकडल्यानंर आणखीच चर्चा सुरू झाली आहे. अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी ही कारवाई केली.

इंदुरीकर महाराज (Indurikar Maharaj) यांच्या कन्येच्या लग्न ठिकाणी ध्वजारोहण कार्याक्रम उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाला. याच वेळी फिर्यादी यांचे 60 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने कोणीतरी चोरांने ओरबडून चोरून नेले. संगमनेर शहर पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने समांतर तपास सुरू केला.

ही चोरी रेकॉर्डवरील आरोपी सागर सुरेश कांबळे (रा. रमानगर वार्ड, श्रीरामपूर) (Shrirampur) याने त्याच्या साथीदारासह केल्याचे समोर आले. या चोरीच्या वाटणीसाठी तो आणि त्याचे साथीदार मोटार सायकलवरून ममदापूर फाटा इथं येणार असल्याची माहिती मिळाली.

Indurikar Maharaj daughter wedding theft
Indurikar Maharaj trolls reply : मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मुलीचं शाही लग्न; 'चर्चा वर्षभर होईल', इंदुरीकरांचा ट्रोलर्सना सडेतोड इशारा!

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तात्काळ ममदापूर फाटा इथं सापळा लावला. सागर कांबळे (वय 32), अब्दुल इब्राहिम पिंजारी उर्फ बबलु (वय 36, रा. श्रीरामपूर) या दोघांना ताब्यात घेतले. या दोघांनी पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत, आतिक आयुब उर्फ आरीफ शेख आणि सनी विलास ढोकणे (रा. वार्ड क्रमांक दोन, श्रीरामपूर), अशांना बरोबर घेऊन केल्याची माहिती दिली. आतिक आणि सनी हे दोघे पसार आहेत.

Indurikar Maharaj daughter wedding theft
Indurikar Maharaj daughter wedding : “काय बोंबलायचं ते बोंबला!” टीकांना झुगारत इंदुरीकर महाराजांच्या कन्येचा शाही विवाह चर्चेचा केंद्रबिंदू

सागर कांबळे आणि अब्दुल पिंजारी या दोघांकडून पोलिसांनी 1 लाख 49 हजार 500 रूपये किंमतीच्या 11.5 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिणे, 70 हजार रुपयांचे दोन मोबाईल आणि 70 हजार रुपये किंमतीची दुचाकी, असा एकूण 2 लाख 89 हजार 500 रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. सागर कांबळे आणि अब्दुल पिंजारी या दोघांना संगमनेर पोलिसांकडे पुढील तपासासाठी वर्ग करण्यात आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

Indurikar Maharaj trolls reply
Indurikar Maharaj daughter wedding
Maharashtra forest department crackdown sandalwood theft
ATF Fuel Theft
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com