JDCC Bank Election : चिडचिड करू नका, गुलाबरावांचा मंगेश चव्हाणांना सल्ला ; 40 वर्षांच्या संघर्षाचा दाखला देत कानपिचक्या

Gulabrao Patil Give advice Mangesh Chavan : महायुतीच्या बैठकीत आमदार मंगेश चव्हाण यांनी नाराजी व्यक्त केली, तर मंत्री गुलाबराव पाटील यांनी त्यांना भरसभेत सबुरीचा सल्ला देत चांगल्याच कानपिचक्या दिल्या.
Minister Gulabrao Patil & MLA Mangesh Chavan
Minister Gulabrao Patil & MLA Mangesh ChavanSarkarnama
Published on: 
Updated on: 

Jalgaon DCC Bank Election updates : जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरून जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. महायुतीच्या १२ जागा बिनविरोध झाल्यानंतरही भाजप- शिवसेनेतील वाद संपायचे नाव घेत नाही आहे.

महायुतीच्या बैठकीत आमदार मंगेश चव्हाण यांनी चाळीसगावात त्यांच्याविरोधात शिवसेनेचे उमेदवार कायम राहिल्यावरून पालकमंत्री गुलाबराव पाटलांना टोमणे मारले. तर चव्हाणांना प्रत्युत्तर देताना गुलाबरावांनी आपल्या भाषणातून त्यांना चांगल्याच कानपिचक्या दिल्या. गुलाबराव पाटलांनी चव्हाणांना चिडचिड न करण्याच सल्लाही दिला.

मंगेश चव्हाण म्हणाले माझा कुणाविरुद्ध व्यक्तिगत राग नाही. मात्र, राजकारणात आपण एखादी भूमिका घेतली की, ती सर्वांनी निभावली पाहिजे. भडगाव- पाचोऱ्याच्या बाबतीत भाजप म्हणून आम्ही भूमिकेला न्याय दिला. माघार घेण्याचा शब्द दिला होता तो आम्ही पाळला. मात्र, चाळीसगावात शिवसेनेचे उमेदवार रिंगणात कायम राहिले. काही हरकत नाही, मी लढणारा कार्यकर्ता आहे, संघर्षाची तयारी आहे. गुलाबभाऊ, नेता म्हणून मी तुम्हाला दोष देणार नाही. परंतु, कुणी महायुतीत मिठाचा खडा टाकत असेल तर ते सहन करणार नाही असं मंगेश चव्हाण म्हणाले.

चव्हाण पुढे म्हणाले, जे कुणी आडवे येतील त्यांना आडवे करू. गिरीश महाजनांनी सांगितलं तर आमच्या दीडशे उमेदवारांनी माघारीसाठी रांग लावली. मात्र, शिवसेनेत तसे झाले नाही. असो मात्र, चाळीसगावातील माझ्याविरोधातील उमेदवारांना युतीतील कुणी ताकद दिली तर मी त्याची व्याजासह परतफेड केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा चव्हाण यांनी दिला.

Minister Gulabrao Patil & MLA Mangesh Chavan
JDCC Bank Election : मंगेश चव्हाणांच्या प्रचाराला गुलाबराव जाणार : म्हणाले, चाळीसगावात बंडखोरी नाही, उन्मेष पाटील म्हणजे शिवसेना नाही

दरम्यान गुलाबराव पाटील यांनी आपल्या भाषणात आमदार मंगेश चव्हाण यांचा चांगलाच समाचार घेतला. त्यांना चांगल्याच कानपिचक्या दिल्या. गुलाबराव म्हणाले, मंगेश दादा तुमच्या वयात असताना आम्ही तुमच्यापेक्षा जास्त गरम होतो. तुमच्या वयात आम्ही जनतेसाठी ३०२, ३०७, ५६ अ, यासारखे गुन्हे अंगावर घेतले.

तुम्ही तुमच्या संघर्षाच्या भरपूर गोष्टी सांगितल्या. तुमच्या वयात आम्ही देखील तीव्र संघर्ष केला आहे. सामान्य कार्यकर्ता, शाखाप्रमुखापासून सुरवात झाली. भगवा झेंडा हाती घ्यायला लोक घाबरायचे तेव्हा आम्ही तो घेऊन बाहेर पडलो. तुमची आत्ता कुठे संघर्षाची सुरुवात झाली आहे. जसे जसे माणसाचे वय वय वाढत जाते, तशी समज येते. वाढत्या वयानुसार मग, माणूस दुष्मनी कमी करण्याचा प्रयत्न करतो. त्याची फलश्रुति म्हणूनच महायुतीच्या १२ जागा बिनविरोध झाल्या आहेत.

Minister Gulabrao Patil & MLA Mangesh Chavan
JDCC Bank Election : जळगाव जिल्हा बॅंकेत महायुतीविरोधात काँग्रेसने दंड थोपटले ; स्वतंत्र पॅनल उतरवलं, सात उमेदवार रिंगणात

मंगेशदादा, तुमच्यावर जो प्रसंग आता आला तो आमच्यावर अनेकदा आला आहे. एका व्यक्तीमुळे महायुतीमध्ये कितीही खडे असले, तरी आम्ही तुमच्या मागे उभे आहोत. तुम्ही जसं वचन दिल आहे तसं आम्ही तुम्हाला वचन देणारे आहोत.

असं म्हणतात की, हल्लीच्या राजकारणात तोंड जरा बंद पाहिजे. लोक तुम्हाला कितीही डिवचण्याचा प्रयत्न करतील, पण तुम्ही या गोष्टी बोलूच नका. यातून तुम्ही चिडचिड करता असे दिसत आहे. जे करतील ते भरतील. तुम्ही एका व्यक्तीमुळे आमच्यावर राग नका करू हे फार चुकीचे आहे. आम्ही तुम्हाला आय लव यू केलेले लोक आहोत, असं म्हणत मंत्री गुलाबराव पाटील यांनी मंगेश चव्हाण यांना कानपिचक्या दिल्या.

तुमच्यासमोर कोण आहे, विचार करू नका. हे बोलल्यामुळे तुम्हाला काही तरी अडचण येत आहे, असं मला वाटायला लागलं आहे. उलट तुम्ही तर नशीबवान आहात. पहिल्यांदा आमदार झाले, सत्तेत आले. आता सत्ता असताना पुन्हा आमदार झाले. आम्ही तर वर्षानुवर्षे विरोधात राहून संघर्ष केला आहे. तुम्हाला सातच वर्षे झालीत, आम्ही ४० वर्षे संघर्ष करतोय.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.