Suresh Jain : सुरेश जैन यांच्या जाहिरातीत शिंदे-दिघेंची एन्ट्री; ठाकरेंचा फोटो गायब, जळगावात नव्या चर्चांना तोंड फुटलं!

Suresh Jain Birthday Advertisements Spark Political Speculation in Jalgaon : माजी मंत्री सुरेश जैन यांच्या वाढदिवसानिमित्त प्रसिद्ध झालेल्या वृत्तपत्रांतील जाहिरातींनी जळगावच्या राजकारणात नव्या चर्चांना तोंड फोडले आहे.
Suresh dada Jain
Suresh dada JainSarkarnama
Published on: 
Updated on: 

Jalgaon Politics, Suresh Jain Birthday Advertisements : जळगावमध्ये माजी मंत्री सुरेश जैन यांच्या वाढदिवसानिमित्त वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातींमध्ये आनंद दिघे आणि एकनाथ शिंदे यांचे फोटो झळकल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. या जाहिरातींमधील फोटोंमुळे जैन यांच्या राजकीय भूमिकेबाबत नव्याने चर्चा सुरू झाली आहे.

जळगावच्या राजकीय वर्तुळात माजी मंत्री सुरेश जैन यांच्या वाढदिवसानिमित्त प्रसिद्ध झालेल्या जाहिरातींची चर्चा रंगली आहे. या जाहिरातींमध्ये शिवसेना शिंदे गटाचे मुख्यनेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आनंद दिघे यांचे फोटो झळकले आहेत. शिवसेना ठाकरे गटाचा राजीनामा दिल्यानंतर कोणत्याही पक्षात जाणार नसल्याचे जैन यांनी स्पष्ट केले होते. मात्र, आता त्यांच्या वाढदिवसाच्या जाहिरातींमध्ये शिंदे आणि दिघे यांचे फोटो दिसल्याने राजकीय चर्चांना नवे वळण मिळाले आहे.

विशेष म्हणजे मंत्री सुरेश जैन यांच्या वाढदिवसानिमित्त वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेल्या जाहिरातींमध्ये आनंद दिघे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेना शिंदे गटातील मंत्री आणि आमदारांचे फोटो झळकल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

Suresh dada Jain
Jalgaon Politics : सुमित पाटलांचा फॉर्म मीच बाद करायला लावला, मीच वैध केला... मंगेश चव्हाणांच्या कबुलीने उडाली वादाची ठिणगी

शिवसेना ठाकरे गटात असताना सुरेश जैन यांनी मे २०२४ मध्ये पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यावेळी वय आणि प्रकृतीच्या कारणास्तव सक्रिय राजकारणातून निवृत्त होत असल्याचे त्यांनी जाहीर केले होते. तसेच, ठाकरे गटाचे सदस्यत्व सोडल्यानंतर आपण कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश करणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले होते.

विशेष म्हणजे, सुरेश जैन हे शिवसेना शिंदे गटात नसतानाही त्यांच्या वाढदिवसानिमित्तच्या जाहिरातींमध्ये शिंदे गटातील नेत्यांचे फोटो झळकल्याने राजकीय चर्चांना सुरुवात झाली आहे. या जाहिरातींमध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो आहे. मात्र, उद्धव ठाकरे किंवा ठाकरे गटातील अन्य कोणत्याही नेत्याचा फोटो दिसत नाही. त्यामुळे या जाहिरातींमधून नेमका कोणता राजकीय संदेश दिला जात आहे आणि पडद्यामागे काही वेगळ्याच घडामोडी सुरू आहेत का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Suresh dada Jain
Jalgaon DCC Bank Election : रक्षा खडसे, मंगेश चव्हाणांना बिनविरोध करण्यात महाजनांना अपयश; दोन जागांवर रंगणार लढत!

दरम्यान, जळगाव लोकसभा निवडणुकीत सुरेश जैन यांनी भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला होता. त्यानंतर त्यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या सदस्यत्वाचाही राजीनामा दिला. आता वाढदिवसानिमित्तच्या जाहिरातींमध्ये शिंदे गटातील नेत्यांचे फोटो झळकल्याने सुरेश जैन यांची नेमकी राजकीय भूमिका काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यांच्या या भूमिकांमधून आगामी काळात जळगावच्या राजकारणात नवी समीकरणे आकाराला येणार आहेत का, याबाबतही राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.