Jalgaon NCP Politics : दोन माजी मंत्र्यांच्या प्रवेशाने राष्ट्रवादीचे जळगावमधील सूर बिघडले; मिले सूर मेरा तुम्हारा होणे अवघडचं !

Gulabrao Deokar and Satish Patil join Ajit Pawar’s NCP : माजी मंत्री डॉ. सतीश पाटील व गुलाबराव देवकर हे दोघेही शरद पवार यांचा पक्ष सोडून राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार यांच्या पक्षात प्रवेश करणार आहेत.

Satish Patil, Sanjay Pawar, Gulabrao Deokar
Satish Patil, Sanjay Pawar, Gulabrao DeokarSarkarnama
Published on
Updated on

Jalgaon political news : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलणार आहेत. माजी मंत्री डॉ. सतीश पाटील व गुलाबराव देवकर हे दोघेही शरद पवार यांचा पक्ष सोडून राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार यांच्या पक्षात प्रवेश करणार आहेत. त्यांच्या प्रवेशाचा मुहुर्तही ठरला आहे.

पक्षश्रेष्ठी अनुकूल असतानाही पक्षातील स्थानिक नेत्यांच्या व पदाधिकाऱ्यांच्या विरोधामुळे गुलाबराव देवकर यांचा पक्षप्रवेश गेल्या कित्येक महिन्यापासून रखडला होता. मात्र आता त्याच स्थानिक पदाधिकाऱ्यांनी देवकर यांच्या स्वागताची भूमिका घेतल्याने त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे. देवकर यांच्यासोबत माजी मंत्री सतीश पाटील हेही अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत. मात्र सुरुवातीला राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष आणि जळगाव जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष संजय पवार यांनी सतीश पाटील यांच्या प्रवेशाला जाहीरपणे विरोध केला होता.


Satish Patil, Sanjay Pawar, Gulabrao Deokar
Ajit Pawar Politics : अजित पवारांच्या पक्षात होत असलेले मातब्बरांचे प्रवेश वाढवणार शिंदे गटाची डोकेदुखी?

सतीश पाटील व गुलाबराव देवकर हे दोघेही जिल्हा बॅंकेच्या राजकारणात सक्रीय आहेत. त्यामुळे या दोघांना राष्ट्रवादीत घेण्यासाठी जिल्हा अध्यक्षांसह काही पदाधिकाऱ्यांनी विरोध केला होता. मात्र, पक्षवाढीसाठी व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता या दोन्ही माजी मंत्र्यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश होतो आहे. मात्र, प्रवेश झाला तरीही स्थानिक कार्यकर्ते या दोन्ही नेत्यांना मनापासून स्विकारतील का हा वेगळा विषय आहे. तर नवं घर पाटील व देवकर यांना मानवेल का हाही महत्वाचा विषय आहे.

शिवाय, एकाच पक्षात येत असले तरी जिल्हा बॅंकेतील राजकीय गटबाजी लक्षात घेता संजय पवार यांचे सतीश पाटील व गुलाबराव देवकर यांच्यातील सूत्र कितपत जुळतात हे पाहावे लागणार आहे. विशेष म्हणजे स्थानिक पातळीवरील राजकारण व पक्षाच्या संघटनात्मक कामकाजात या दोन्ही मंत्र्यांना हस्तक्षेप करता येणार नाही या अटीवर त्यांचा प्रवेश होत असल्याची माहिती आहे. पण प्रत्यक्षात राजकारणात हस्तक्षेप न होणं हे कितपत शक्य आहे?


Satish Patil, Sanjay Pawar, Gulabrao Deokar
Nilesh Lanke : याची कशी जिरवता येईल, असं राजकारण कोणी केलं? खासदार लंकेंनी कोणाचं नाव घेतलं!

देवकर व पाटील यांच्यासह माजी विधान परिषद सदस्य दिलीप सोनवणे, चोपड्याचे माजी आमदार कैलास पाटील, पाचोऱ्याचे माजी आमदार दिलीप वाघ, जिल्हा बँकेच्या माजी संचालक तिलोत्तमा पाटील हे सगळेच अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत.

जळगाव जिल्ह्यात अमळनेर वगळता इतर मतदारसंघात अजित पवार पक्षाचे प्राबल्य नाही. त्यामुळे या सगळ्यांच्या एकत्रित प्रवेशाने जिल्ह्यात पक्षाची ताकद वाढणार असली तरी पक्षाचे स्थानिक नेते व पदाधिकारी नव्या लोकांना कितपत स्विकारतात हे पाहावे लागणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com