Jalgaon MLC Election : एकनाथ शिंदेंचा एक फोन अन् रात्रीत गेम फिरला, गिरीश महाजनांच्या शिलेदाराचा विजयाचा मार्ग मोकळा..

Anil Chaudhari's Withdrawal Jalgaon MLC : जळगाव विधानपरिषद निवडणुकीच्या रिंगणातून अपक्ष उमेदवार अनिल चौधरी यांनी माघार घेतली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या एका फोनमुळे जळगाव विधान परिषद निवडणुकीत रात्रीतून समीकरणे बदलली.
Girish Mahajan & Eknath Shinde
Girish Mahajan & Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Jalgaon MLC Election : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या एका फोनमुळे जळगाव विधान परिषद निवडणुकीत एका रात्रीत गेम फिरला आहे. अपक्ष उमेदवार अनिल चौधरी यांनी आपली निवडणुकीतून अचानक माघार घेण्याचा निर्णय घेतल्याने मंत्री गिरीश महाजन यांचे जवळचे शिलेदार व महायुतीचे अधिकृत उमेदवार नंदकिशोर महाजन यांच्या विजयाचा मार्ग त्यामुळे मोकळा झाला आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व बच्चू कडू यांनी आपल्याशी फोनवर संपर्क केल्याचे अनिल चौधरी यांनी सांगितले. त्यांचा मान ठेवून मी निवडणुकीत थांबत आहे असे त्यांनी सांगितले. काल मतदानसाठी अवघे काही तास बाकी असताना अनिल चौधरी यांनी पत्रकारपरिषद घेत आपण निवडणुकीतून माघार घेत असल्याची घोषणा केली. दरम्यान अनिल चौधरी हे लवकरच एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचेही बोलले जात आहे.

दरम्यान मी देखील मंत्री गिरीश महाजन यांचा निकटवर्तीय होतो. महाजन हे माझे मोठे बंधू आहेत. परंतु त्यांनी आशीर्वाद दिला नाही, त्यांनी मला आशीर्वाद दिला असता तर कदाचित मी आज आमदार राहिलो असतो, अशी खंत अनिल चौधरी यांनी यावेळी बोलून दाखवली. नंदकिशोर महाजन यांच्या मैत्री खातर आपण निवडणुकीतून माघार घेत असल्याचे त्यांनी सांगितले.

Girish Mahajan & Eknath Shinde
Jalgaon MLC Election : नंदकिशोर महाजनांच्या उमेदवारीचे श्रेय कुणाला? रक्षा खडसे व गिरीश महाजन यांच्यात कलगीतुरा

दरम्यान, जळगाव विधान परिषद निवडणुकीत यापूर्वी शिवेसेनेच्या नगरसेविका रेश्मा कूंदन काळे यांनी देखील एकनाथ शिंदे यांच्या आदेशावरुन माघार घेतली होती. आता अनिल चौधरी यांना देखील एकनाथ शिंदे यांनी विनंती केल्याने त्यांनीही माघार घेतली. त्यामुळे भाजपचे महायुतीचे अधिकृत उमेदवार नंदकिशोर महाजन यांचा मार्ग अधिक सोपा झाला आहे. त्यांचा विजय आता निश्चित मानला जात आहे.

Girish Mahajan & Eknath Shinde
Jalgaon MLC Election: जळगावचा तिढा अखेर सुटला! शिंदेंच्या भेटीनंतर रेश्मा काळेंनी घेतली माघार

आता रिंगणात दोनच उमेदवार

आज मतदानाचा दिवस आहे. अंतिम चार उमेदवार रिंगणात होते. चारपैकी शिवेसेनेच्या नगरसेविका रेश्मा काळे व प्रहारचे अनिल चौधरी या दोघांनी माघार घेत महायुतीला समथर्न दिले याहे. त्यामुळे भाजप-महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन व शिवसेना उबाठाचे उमेदवार शरद तायडे दोघेच रिंगणात राहिले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com