MLC Election : गुलाबरावांचा आटापिटा फेल, जळगावच्या जागेवर भाजपच्या महाजनांना उमेदवारी

Gulabrao Patil Vs BJP : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते तथा मंत्री गुलाबराव पाटील जळगाव विधानपरिषदेच्या जागेसाठी चांगलेच आग्रही होते. पण ही जागा आता भाजपच्या वाट्याला गेली आहे.
Gulabrao Patil effort fails in Jalgaon MLC election
Gulabrao Patil effort fails in Jalgaon MLC electionsarkarnama
Published on
Updated on

Jalgaon Political News: जळगाव विधानपरिषदेच्या जागेवरून गेल्या काही दिवसांपासून महायुतीमध्ये सुरू असलेला सस्पेन्स अखेर संपला आहे. जळगावची जागा भाजपने आपल्याकडेच ठेवत माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा भाजपचे रावेर क्षेत्रप्रमुख नंदू महाजन यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

रविवारी (ता.३१) रात्री उशिरा दिल्लीतून भाजपच्या ११ जणांच्या नावाची यादी जाहीर करण्यात आली. त्यात नंदकिशोर महाजन यांचेही नाव जाहीर करण्यात आलं. महाजन आज (ता.१) आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी ही जागा शिवसेनेकडे खेचून आणण्यासाठी केलेला आटापिटा फेल गेला आहे. गुलाबरावांचे चिरंजीव प्रताप पाटील हे या जागेवर इच्छुक होते. आपल्या मुलाला आमदार करण्यासाठी गुलाबरावही स्वतः कमालीचे उत्सुक होते.

Gulabrao Patil effort fails in Jalgaon MLC election
MLC Election : विधान परिषदेची गाडी हुकली, एकनाथ शिंदेंच्या पक्षातील 'फायर ब्रँड' महिला नेत्या नाराज, म्हणाल्या, 'साहेब...'

तशी जळगावची जागा परंपरागत भाजपची आहे. पण आपल्या मुलासाठी गुलाबरावांनी या जागेवर शिवसेनेचा दावा सांगितला. जागा शिवसेनेला मिळावी त्यासाठी शर्थीचे प्रयत्नही केले. पण ही जागा भाजपला सुटल्याने गुलाबराव पाटलांचे स्वप्नं भंगले आहे. शिवाय शिवसेनेची आमदार किशोर पाटील यांच्या मुलाचेही नाव चर्चेत होते. तेही मागे पडले.

जळगावच्या जागेवर स्थानिक पातळीवर शिवसेना व भाजप दोन्ही पक्षांनी दावा सांगितला. मात्र भाजपला जागा सुटल्याने शिवसेनेतील इच्छुकांचा हिरमोड झाला आहे. नंदकिशोर महाजन यांना उमेदवारी जाहीर होताच रात्री कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. भाजप कार्यकर्त्यांमध्ये आता कमालीचा उत्साह पाहायला मिळत आहे.

नंदकिशोर महाजन यांच्या कार्यकाळात भाजपने लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसोबतच नगरपालिका निवडणुकांमध्ये देखील अतिशय चांगली कामगिरी केली आहे. भाजप पक्षासोबत निष्ठेने काम केल्याचे त्यांना बक्षीसी मिळाल्याचे मानले जात आहे.

नंदकिशोर महाजन हे कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय असून पक्षाचे कट्टर कार्यकर्ते म्हणून ओळख असल्याने पक्षाने त्यांच्यावर विश्वास टाकल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. दुसरीकडे भारतीय जनता पक्षाच्या वतीने अनेक नावे चर्चेत होती. यात प्रामुख्याने डॉ. केतकी पाटील व उद्योजक नंदू अडवाणी यांचे नाव होते.

Gulabrao Patil effort fails in Jalgaon MLC election
MLC Election : विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर धक्कादायक घडामोडी? एकनाथ शिंदेंच्या बैठकीत ट्विस्ट, नेत्यांना महत्वाचा सूचना

केतकी पाटील यांचे नाव फायनल होईल असे वाटत असताना नंदू महाजन यांचे नाव जाहीर करत एकप्रकारे इतर इच्छुकांना धक्काच दिला. केतकी पाटील यांनी उमेदवारी अर्ज ही घेतला होता.

याशिवाय शिवसेनेचे प्रताप पाटील यांनीही अर्ज घेतला होता. या सर्व घडामोडींमध्ये नेमकी जागा शिवसेनेला की भाजपला सुटते व नेमकी कुणाला उमेदवारी मिळणार ? याबाबत मोठी उत्सुकता लागली होती. यात नंदकिशोर महाजन यांनी बाजी मारली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com