MLC Election : जळगावात इच्छुक बसले देव पाण्यात घालून ; गुलाबरावांच्या पुत्राने अर्ज घेतला, भाजपकडूनही तयारी पूर्ण...

Jalgaon MLC Election : जळगावची जागा पारंपारिक दृष्ट्या भाजपची असली तरी यावेळी शिवसेनेने या जागेवर दावा केला आहे. त्यामुळे नक्की ही जागा कुणाला मिळते हे पाहण्याकडे अवघ्या जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
Girish Mahajan & Gulabrao Patil
Girish Mahajan & Gulabrao PatilSarkarnama
Published on
Updated on

Jalgaon MLC Election : विधानपरिषदेच्या महायुतीच्या जागावाटपात सुरुवातीपासून जळगावची जागा चर्चेच्या केंद्रस्थानी राहिली आहे. दोन दशकांपासून अपवादवगळता ही जागा भाजपच्या ताब्यात होती. मात्र, यावेळी शिवसेनेनेही या जागेवर दावा केल्याने चुरस वाढली. पालकमंत्री गुलाबराव पाटलांचे पुत्र प्रताप पाटील यांनी उमेदवारी अर्ज घेतला आहे. स्वत: गुलाबरावांनी या जागेसाठी जोर लावला आहे.

दुसरीकडे, जागा भाजपकडेच राहणार, असे गृहित धरून पक्षाने इच्छुकांनी तयारी सुरु केली आहे. भाजपकडून डॉ. केतकी पाटील व व्यावसायिक नंदू अडवाणी इच्छुक असून त्यांची नावे पहिल्यादिवसापासून चर्चेत आहेत. पैकी डॉ. केतकी यांचे नाव निश्‍चित होईल असे बोलले जात आहे. केतकी पाटील या माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांच्या कन्या आहेत. केतकी पाटील यांनीही आपला अर्ज तांत्रिक व कायदेशीर बाबींची पूर्तता करून रेडी ठेवल्याचे सांगितले जात आहे.

जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची निवडणूक नेहमीच प्रतिष्ठेची झालेली आहे. ही भाजपची पारंपारिक जागा आहे. गेल्यावेळी भाजपचे चंदूभाई पटेल या जागेवर आमदार होते. मात्र, शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी या जागेवर दावा सांगत आपल्या मुलाला रिंगणात उतरवण्याची तयारी केल्याने या जागेचा तिढा अधिक वाढला. भाजपच्या स्थानिक नेतृत्वाने मात्र ही जागा आपल्याकडेच ठेवण्याची प्रयत्न केले आहेत.

Girish Mahajan & Gulabrao Patil
MLC Election : भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीत विधानपरिषदेचा फॉर्म्युला फायनल; कोणता पक्ष-कोणती जागा, कोण उमेदवार सगळं ठरलं

महायुतीची फायनल यादी तयारी झाली असून यात जळगावची जागा भाजपकडेच राहणार असल्याचं सध्या तरी सांगितलं जात आहे. परंतु तशी अधिकृत घोषणा अजून झालेली नाही. त्यामुळे आजूनही दोन्ही पक्षांमधील इच्छुक उमेदवार जागा त्यांच्या पक्षाकडे राहावी, म्हणून देव पाण्यात घालून बसले आहेत. आज दुपारपर्यंत ही घोषणा होऊ देखील शकते. नाहीच झाली तर उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी अर्थात सोमवारी ही घोषणा होईल. त्यामुळे दोन्ही पक्षातील इच्छुकांनी उमेदवारी अर्ज घेतला असला, तरी तो पक्षादेश आल्यानंतरच दाखल करता येणार आहे. त्यामुळे सर्वांनाच आता पक्षादेशाची प्रतीक्षा आहे.

Girish Mahajan & Gulabrao Patil
MLC Election : नाशिक शिवसेना तर संभाजीनगर, जळगाव दोन्हीकडे भाजप लढण्याची शक्यता.. पाहा संभाव्य यादी

महाविकास आघाडीचा उमेदवार फायनल

विधान परिषदेच्या राज्यातील सर्व १७ जागांवर महाविकास आघाडीकडून उमेदवार दिले जाणार आहे. मविआच्या जागा वाटपाच्या समीकरणात जळगावची जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वाट्याला गेली आहे. पक्षाने जळगाव महानगरप्रमुख तथा माजी नगरसेवक शरद तायडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तायडे हे प्रचाराला लागले असून त्यांनी जिल्हाभरात भेटीगाठीही सुरू केल्या आहेत.

जिल्ह्यात महाविकास आघाडीची ताकद महायुतीच्या तुलनेत कमी असली, तरी महायुतीमधील भाजप-शिवसेनेतील काही तालुक्यांमधील टोकाला गेलेला वाद पाहाता महायुतीमधील काही मते तायडेंना मिळू शकतील, अशी देखील चर्चा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com