Jalgaon MLC Election: जळगाव विधान परिषदेची जागा कोणाला? गुलाबराव पाटील यांच्या दाव्याने भाजपमध्ये खळबळ

Gulabrao Patil’s Claim Creates Confusion Among BJP Leaders: जळगाव विधान परिषद निवडणुकीत महायुतीत जागावाटपावरून संघर्ष वाढला आहे. गुलाबराव पाटील यांनी शिवसेनेकडून दावा केल्यानंतर भाजपनेही आपली भूमिका ठाम केली आहे.
Jalgaon MLC Election
Jalgaon MLC ElectionSarkarnama
Published on
Updated on

BJP Vs Shivsena: विधान परिषद निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया शेवटच्या टप्प्यात आहे. जागा वाटपाबाबत विविध दावे केले जात आहेत. त्यातच मंत्री गुलाबराव पाटील यांनी नवा बॉम्ब टाकला आहे.

विधान परिषदेच्या 17 जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास शेवटचे दोन दिवस शिल्लक आहेत. भाजपने 12 जागा लढविण्याचा दावा केला आहे. काही जागांवर उमेदवारांना सूचना देखील करण्यात आल्या आहेत.

अशातच मंत्री गुलाबराव पाटील यांनी मात्र वेगळाच दावा केला आहे. महायुतीत जागा वाटपाचा अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. जागा वाटपाबाबतच्या सर्व बातम्या तथ्यहीन असल्याचा दावा त्यांनी केला.

Jalgaon MLC Election
Maharashtra Teacher Recruitment News: रखडलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेला अखेर गती; पवित्र पोर्टलसाठी नवी मुदतवाढ

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार याबाबत अंतिम निर्णय घेतील. याविषयी काही लोकांकडून जाणीवपूर्वक गोंधळाची स्थिती निर्माण केली जात आहे. वाटपाचा कोणताच निर्णय झाला नाही, असा खळबळजनक दावा मंत्री पाटील यांनी केला.

जळगाव विधान परिषदेची जागा सध्या भाजपकडे आहे. या जागेवर शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाने धावा केला आहे. त्यावरून दोन्ही पक्षांतील आमदार आणि नेत्यांमध्ये ओढाताण सुरू आहे. मंत्री पाटील यांच्या दाव्यामुळे भाजपच्या इच्छुकांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली.

Jalgaon MLC Election
Jalgaon MLC Election: जळगावसाठी गिरीशभाऊ कॉन्फिडंट; इच्छुकांना आता फक्त निरोपाची प्रतीक्षा!

भाजपच्या सर्वच नेत्यांनी याबाबतचा निर्णय मंत्री गिरीश महाजन हे घेणार असल्याचे स्पष्ट केले होते. डॉ. केतकी पाटील आणि नंदू अडवाणी हे दोन भाजपचे प्रबळ इच्छुक आहेत. या इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पक्षाच्या निर्णयाची प्रतीक्षा कायम ठेवली आहे.

Jalgaon MLC Election
Tukaram Mundhe News: पदभार स्वीकारताच तुकाराम मुंढेंचा दणका! 3 दिवसांत 53 छापे, 25 FIR, 33 जण तुरुंगात

अशातच मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलेल्या दाव्याने खळबळ उडाली आहे. कोणत्याही स्थितीत शिवसेना जळगावच्या जागेवर दावा सोडण्याच्या मनस्थितीत नसल्याचे संकेत यातून मिळाले आहेत. त्यामुळे येत्या दोन दिवसात भाजप आणि शिवसेना दोन्ही पक्षांत ताणला गेलेला वाद कोणत्या टोकावर पोहोचतो याची उत्सुकता वाढली आहे.

मंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगाव स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जागेवर शिवसेनेचा (Shivsena) हक्क सांगितला आहे. "या जागेवर माझा मुलगा प्रतापराव पाटील याच्या उमेदवारीची मागणी आम्ही पक्षाकडे केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com