MLC Election : जागा भाजपला सुटल्याचे समजताच मंत्री गुलाबरावांची धावपळ; शिंदेंना भेटण्यासाठी रवाना, इकडे जळगावात वेगळ्याच चर्चा

Jalgaon MLC Election, Gulabrao Patil : महायुतीचे फायनल जागावाटप अजून घोषित झालेले नाही. मात्र, जळगावची जागा भाजपला सुटल्याचे सूत्रांकडून समजते आहे. त्यामुळे शिंदे गटात अस्वस्थता निर्माण झाली आहे.
Gulabrao Patil
Gulabrao Patil Sarkarnama
Published on
Updated on

MLC Election : काही जागांवर भाजप-शिवसेनेमध्ये एकमत होत नसल्याने अजून फायनल जागावाटप घोषित करण्यात आलेलं नाही. आज दुपारपर्यंत ते घोषित होईल असे सांगितले जात होते मात्र अद्याप ते घोषित झालेले नाही. परंतु जळगावची जागा भाजपला गेल्याचे सूत्रांकडून सांगितले जात असून त्यामुळे शिंदे गटात अस्वस्थता निर्माण झाली आहे.

काही जागांवर भाजप-शिवसेनेमध्ये एकमत होत नसल्याने अजून फायनल जागावाटप घोषित करण्यात आलेलं नाही. आज दुपारपर्यंत ते घोषित होईल असे सांगितले जात होते मात्र अद्याप ते घोषित झालेले नाही. परंतु जळगावची जागा भाजपला गेल्याचे सूत्रांकडून सांगितले जात असून त्यामुळे शिंदे गटात अस्वस्थता निर्माण झाली आहे.

दरम्यान शिवसेना नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील हे एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी जळगावहून तातडीने मुंबईकडे रवाना झाले. जळगाव विधान परिषदेचे जागा भाजपला सुटल्याच्या बातमीनंतर गुलाबराव पाटीलांनी तडक मुंबईकडे कूच केल्याने जळगावच्या राजकारणात घडामोडींना वेग आला आहे.

Gulabrao Patil
MLC Election : जळगावात इच्छुक बसले देव पाण्यात घालून ; गुलाबरावांच्या पुत्राने अर्ज घेतला, भाजपकडूनही तयारी पूर्ण...

जळगाव विधान परिषदेच्या जागेवर भाजप व शिवसेना शिंदे गट अशा दोन्ही पक्षाने दावा केला आहे. मंत्री गुलाबराव पाटील यांनी आपले पुत्र प्रतापराव पाटील यांच्यासाठी या जागेवर दावा केला आहे. मात्र, ही जागा भाजपला सुटल्याचं बोललं जाऊ लागल्याने ही जागा शिवसेनेला मिळावी यासंदर्भात मंत्री गुलाबराव पाटील पुन्हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत.

जळगावची जागा परंपरागत भाजपची आहे. त्यामुळे स्थानिक भाजप नेते ही जागा सोडायला तयार नाही. भाजपकडून या जागेसाठी डॉ. केतकी पाटील, नंदू अडवाणी, नंदू महाजन यांच्या नावाची चर्चा आहे. डॉ. केतकी पाटील यांचे नाव भाजपकडून फायनल होण्याची शक्यता आहे. त्याचवेळी शिवसेनेकडून मंत्री गुलाबराव पाटील यांचे चिरंजीव प्रतापराव पाटील यांनी कालच उमेदवारी अर्ज घेतला आहे. त्यांना केवळ आता पक्षादेशाची प्रतीक्षा आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आता केवळ सोमवारचा दिवस आहे. परंतु त्यापूर्वी मंत्री गुलाबराव पाटील मुंबईकडे रवाना झाले आहेत. काय निर्णय होतो याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

याआधीच जळगाव जिल्ह्यातील शिवसेनेच्या सर्व आमदारांच्या शिष्टमंडळाने एकनाथ शिंदे यांची भेट घेत घेतली होती. त्यात जळगावची जागा शिवसेना द्यावी अथवा भाजपसोबत मैत्रीपूर्ण लढतीसाठी परवानगी द्यावी अशी मागणी केली आहे. त्यामुळे अंतिम निर्णयाकडे इच्छुकांचे लक्ष आहे.

Gulabrao Patil
MLC Election : नाशिक शिवसेना तर संभाजीनगर, जळगाव दोन्हीकडे भाजप लढण्याची शक्यता.. पाहा संभाव्य यादी

गुलाबराव मुलासह भाजपत जाणार?

तर, दुसरीकडे गुलाबराव पाटील व त्यांचे पुत्र प्रताप पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा जळगावच्या राजकारणात सुरु झाल्या आहेत. त्यावर स्वत:गुलाबरावांनी माध्यमांशी बोलताना भाष्य केलं आहे. मी गेली 45 वर्षे शिवसेनेत घातली असून आताही मी शिवसेनेचा मंत्री आहे. माझ्यावर शंका घेणे उचित नाही असं गुलाबरावांनी म्हटलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com