Jalgaon BJP Mayor : जळगावच्या महापौर झाल्या कडक शिस्तीच्या मॅडम, गेटवर उभे राहून महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची घेतली शाळा

Jalgaon BJP Mayor Deepmala Kale : दीपमाला काळे या भाजपच्या असून त्या जळगाव महापालिकेच्या महापौर आहेत. नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत त्यांनी स्वत: उपस्थितीत राहून अधिकारी व कर्मचाऱ्यांची हजेरी घेतली.
Jalgaon BJP Mayor Deepmala Kale
Jalgaon Mayor Deepmala Kale standing at the municipal office gate checking employee attendance and warning latecomers to maintain discipline in the civic administration.Sarkarnama
Published on
Updated on

jalgaon Politics : महापालिकेच्या कामकाजात शिस्त आणण्यासाठी भाजपच्या महापौर दीपमाला काळे यांनी नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत सोमवारी सकाळी (दि. २३) अचानक महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारावर स्वतः उपस्थित राहून कर्मचाऱ्यांची शाळा घेतली.

सोमवारी सकाळी ९:५० वाजता महापौर दीपमाला काळे यांनी महापालिकेच्या आवारात येऊन लेटलतीफ (कामावर उशीरा येणाऱ्यांची) कर्मचाऱ्यांची शाळा घेतली. त्या स्वत: गेटजवळ उभ्या राहिल्या. एक - एक कर्मचारी उशीरा कार्यालयात दाखल होत होता. प्रत्येकाला जाब विचारत यापुढे कामावर वेळेत या अन्यथा कारवाई करु असा इशारा त्यांनी कर्मचाऱ्यांना दिला.

महापौर दीपमाला काळे, म्हणाल्या महापालिकेत भेट दिल्यानंतर हे स्पष्ट झाले की, काही अधिकारी व कर्मचारी आपल्या सोईनुसार कार्यालयात येतात. हे गंभीर असून आता प्रशासक काळ संपला आहे हे सर्वांनी लक्षात घ्यावे. आपण नागरिकांच्या कराच्या पैशातून वेतन घेतो, त्यामुळे नागरिकांप्रती जबाबदारी आणि कर्तव्याची जाणीव ठेवणे बंधनकारक आहे.

Jalgaon BJP Mayor Deepmala Kale
Nashik NMC : राष्ट्रवादीला जाग आली पण उशीर झाला ; भाजपचे मच्छिंद्र सानप घोड्यावर बसले, मुंडावळ्याही बांधल्या, आता फक्त..

गेल्या काही दिवसांपासून अधिकारी व कर्मचारी वेळेवर कार्यालयात हजर राहत नसल्याची तक्रार नागरिकांकडून केली जात होती. अधिकारी वेळेवर भेटत नाहीत त्यामुळे कामे रखडतात अशा तक्रारी नागरिकांनी केल्या होत्या. याच पार्श्वभूमीवर महापौरांनी ॲक्शन मोड'वर येऊन सोमवारी सकाळी पावणेदहाला महापौर कार्यालयाच्या गेटवर उपस्थित राहून त्यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांची चांगलीच हजेरी घेतली.

यावेळी अनेक कर्मचारी उशिरा येताना आढळून आले. किती वाजता यायला पाहीजे. आता किती वाजले? उद्यापासून सकाळी ९:४५ पर्यंत सर्वांनी कार्यालयात हजर राहणे बंधनकारक आहे. दहानंतर येणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला.

वेळेवर हजेरी लावून नेमून दिलेल्या विभागात तत्काळ कामास सुरुवात करावी. कर्तव्यात कसूर खपवून घेतली जाणार नाही. सर्वांनी गळ्यात आयकार्ड घाला, सर्वांच्या गळ्यात आयकार्ड दिसले पाहीजे अशा सूचना त्यांनी दिल्या. ज्यांच्या गळ्यात आयकार्ड नव्हते त्यांना महापौरांनी तंबी दिली. महापौरांनी केवळ कर्मचाऱ्यांनाच नव्हे तर अधिकाऱ्यांनाही शिस्तीच्या चौकटीत आणण्याचे निर्देश दिले. हजेरीबाबत अधिकृत आदेश तातडीने काढण्याचे आदेश संबंधित विभागाला देण्यात आले. (jalgaon politics )

Jalgaon BJP Mayor Deepmala Kale
Nashik NMC : उद्या ठरणार स्थायी सभापती, फुटीच्या धास्तीने भाजपचे सदस्य थेट इंडिया-भारत सीमेवर, रिसॉर्टचं नावही कळालं

महापालिका ही जनसेवेची संस्था आहे. वेळेचे पालन, शिस्त आणि सेवा हीच खरी लोकशाहीची ओळख आहे. नागरिकांना वेळेत, दर्जेदार सेवा देणे हाच आमचा ठाम निर्धार असल्याचे महापौर दीपमाला काळे यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com